मुंबई बाजार समितीसाठी साताऱ्यातून फिल्डिंग 

mumbai market committe
mumbai market committe

सातारा : मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीचे वारे सध्या जिल्ह्यात वाहू लागले असून, उद्या (ता. 29) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. जिल्ह्यातून बाजार समितीवर संचालक होण्यासाठी दोघे जण इच्छुक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या बाजार समितीत जिल्ह्यातील 143 मतदार असल्याने या निवडणुकीत जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी लक्ष घातले आहे. 

मुंबई बाजार समितीवर आजपर्यंत पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे. जिल्ह्यातील बाळासाहेब सोळसकर हे समितीचे सभापती राहिले आहेत. येत्या 29 फेब्रुवारीला होणाऱ्या या निवडणुकीत जिल्ह्यातील कोण संचालक होणार याची उत्सुकता आहे. मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील बाजार समितींचे संचालक मिळून 601 मतदार आहेत. 

 सातारा जिल्ह्यातील 143 मतदारांचा समावेश असून सर्वाधिक मतदार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच आहेत. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतून दोन संचालक निवडून दिले जातात. मागीलवेळी साताऱ्यातून कोरेगाव बाजार समितीतून राष्ट्रवादीचे बाळासाहेब सोळसकर हे संचालक झाले होते, तसेच माथाडी संघटनेतून माजी आमदार शशिकांत शिंदे हेही मुंबई बाजार समितीवर संचालक होते.

 प्रत्येक जिल्ह्यातून एक संचालक निवडला जातो. यावेळेस सोळसकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे- पाटील यांचेही नाव इच्छुकांमध्ये आहे. त्यामुळे मुंबई बाजार समितीवर संचालक होण्यासाठी दोन इच्छुकांनी जोरदार "फिल्डिंग' लावली आहे. सोळसकरांनी उमेदवारी अर्जही दाखल केलेला आहे. जिल्ह्यात असलेल्या 143 मतांपैकी सर्वाधिक मते राष्ट्रवादीकडे असल्याने जिल्ह्यातून त्यांचा संचालक बाजार समितीवर जाऊ शकणार आहे. 

सोळसकर की साबळे- पाटील 

या वेळेस सोळसकरांना पुन्हा संधी मिळणार, की साबळे- पाटील यांना संधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी म्हणजेच बुधवारी याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com