
सांगली : मिरज तालुक्यातील पाच गावांसह जिल्ह्यातील सहा गावांतील पाणी पिण्यायोग्य नसून ते दूषित झाले आहे. त्यामध्ये आटपाडी तालुक्यातील एक गावाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेतर्फे प्रत्येक महिन्याला पाणी व टीसीएल तपासणी अहवाल प्रसिद्ध केला जातो. एप्रिलचा पाणी व टीसीएल तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील बेळंकी, सलगरे, गुंडेवाडी, नांद्रे, बेडग आणि आटपाडी तालुक्यातील बनपुरी या सहा गावांतील पाण्याचे नमुने दूषित असल्याचे अहवालात नमूद केले आहे.