सोलापूरची लोकसंख्या 32 लाख, रुग्णवाहिका 25 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

सोलापूर - सोलापुरात 2014 पासून महाराष्ट्र महाराष्ट्र इमरजन्सी मेडिकल सर्व्हिस सुरू झाली. प्रारंभी नऊ हजार रुग्णांना दवाखान्यांत पोचवून त्यांचे प्राण वाचविले. पाच वर्षात रुग्णांची संख्या आता दोन लाख 30 हजारांवर पोचली आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 32 लाख इतकी असूनही शहर-जिल्ह्यात या उपक्रमांतर्गत 108 च्या अवघ्या 25 रुग्णवाहिका आहेत. त्यामुळे बहुतांश वेळा रुग्णांना तत्काळ सेवा मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळते. जिल्ह्यासाठी आणखी 25 ते 30 रुग्णवाहिकांची गरज असूनही पाच रुग्णवाहिकांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. 

वाहन अपघात, हल्ला, भाजणे, हृदयरोग, पडणे, विषबाधा, प्रसूती, विजेचा धक्‍का, मोठे अपघात, आत्महत्येचा प्रयत्न आणि प्रसूती अशा विविध प्रकारच्या रुग्णांना सुखरूपपणे उत्तम दर्जाच्या रुग्णालयापर्यंत पोच करण्याचे काम 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून यशस्वी पार पडले आहे. परंतु रुग्णांची परिस्थिती नसताना किंवा नकार असतानाही काही जण संबंधिताला ठराविक दवाखान्यातच नेतात, अशा तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. मात्र ही रुग्णसेवा सर्वसामान्यांसाठी वरदानच ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षी एक हजार 736 महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेतच झाल्याची माहिती डॉ. अनिल काळे यांनी दिली. 

Web Title: population of Solapur is 32 lakh ambulance 25