Sangli : उच्चदाबाच्या रेल्वे लाईनचा शॉक लागल्याने हमालाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Sargar

सांगली : उच्चदाबाच्या रेल्वे लाईनचा शॉक लागल्याने हमालाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली - रेल्वे वॅगनमध्ये साखर भरत असताना उच्चदाबाच्या रेल्वे लाईनचा शॉक लागल्याने प्रकाश परशुराम सरगर (वय ३४ रा. तात्यासाहेब मळा सांगली, मुळ गाव करगणी ता.आटपाडी) या हमालाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास सांगली रेल्वेस्टेशनवरील मालधक्कयावर ही दुर्घटना घडली.

तरूण हमालाचा मृत्यू झाल्याने संतप्त हमालांनी आरोप करत काम बंद ठेवले. तर संबंधित दोषीवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. त्यामुळे रेल्वे स्टेशन मालधक्का आणि सिव्हील हॉस्पीटल आवारात काही काळ तणाव निर्माण झाला होता. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी रेल्वे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा: गोपीचंद पडळकर,तानाजी पाटलांचा अर्ज फेटाळला ; आटपाडीत पोलिस तैनात

याबाबत घटनास्थळावरून आलेली माहिती अशी, सध्या रेल्वे स्टेशन मालधक्क्यावर साखर निर्यातीच्या वॅगन भरून पाठवण्याचे काम सुरू आहे. आज दुपारी ट्रकमधून साखर वॅगनमध्ये भरत असताना प्रकाश साखरेच्या ट्रकमध्ये चढून साखरेवर झाकलेली ताडपत्री काढत होता. तर अन्य हमाल ट्रकच्या बाजूला उभे होते. वॅगनच्या जवळ ट्रक उभा केल्यानंतर प्रकाशने ताडपत्री ट्रकच्या टपार टाकताच वरून गेलेल्या उच्चदाब वाहिणीचा त्याला शॉक लागला.

विजेच्या धक्क्यामुळे प्रकाशचे जमिनीवर कोसळला. अन्य हमालांनी आराडाओरड केल्यानंतर उच्चदाब वाहिणीचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. प्रकाशला तातडीने वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकाश जागेवरच मृत झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

loading image
go to top