पॉस मशिनवर बॅंकिंग दिवास्वप्न ठरणार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

कऱ्हाड - सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानात देण्यात आलेल्या पॉस मशिनने धान्य दुकानदारांना वैताग आणला आहे. मशिनमध्ये अनेकांच्या बोटांचे ठसे आणि आधार क्रमांक मॅच होत नाहीत, सर्व्हर मिळत नाही यासह अनेक अडचणींमुळे अनेक ग्राहकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. पॉस मशिनवर धान्याचा मेळ बसवता बसवता नाकीनऊ येत असल्यामुळे त्या मशिनवर बॅंकिंग व्यवहार करण्याचे दिवास्वप्न ठरणार आहे. 

मशिनद्वारे धान्य वाटप करताना अनेक जणांचे बोटांचे ठसे मॅच होत नाहीत, अनेकांचे आधार क्रमांक येत नाहीत, अनेकदा सर्व्हरच मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांना हेलपाटे मारावे लागतात. त्यासंदर्भात दुकानदार तहसील कार्यालयात संपर्क करतात. मात्र, त्यांच्याकडेही उत्तरे नसल्याचे दुकादारांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यासह ग्राहकांची अडचण होत आहे. 

त्याचबरोबर संबंधित मशिनवर ग्रामीण भागात जिथे बॅंका नाहीत तेथील बॅंकिंग व्यवहारही सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येणार होती. मात्र, अनेक ठिकाणी धान्य वाटपाचीच कार्यवाही पुरी होत नसल्याने तेथील बॅंकिंग व्यवहारही कागदावरच राहणार आहेत. त्याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. 

‘रेंज’ची अडचण
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वाडी-वस्तीवर. डोंगदऱ्यांतील गावांमध्ये सध्या मोबाईलची ‘रेंज’च येत नसल्याचे वास्तव आहे. त्यातच संबंधित मशिनद्वारे धान्य पुरवठा करावयाचा असल्याने ‘रेंज’अभावी अनेक ठिकाणी अडचण निर्माण होत आहे. पॉस मशिनला ‘रेंज’ नसल्यानेही त्यावरील कार्यवाही करताना अडचणी निर्माण होत आहेत. 

पॉस मशिन वापरात रेंज नसणे, अनेकदा सर्व्हर डाऊन असतो, डाटा फिडिंग शंभर टक्के झालेले नाही. जे फीडिंग झाले आहे ते २०११ च्या जनगणेनुसार झालेले आहे. त्यानंतर वाढलेल्या नावांचे फिडिंग झालेले नाही. अनेकांची आधार कार्डही काढायची राहिली आहेत. त्या अडचणी त्वरित दूर होणे आवश्‍यक आहे. धान्यवाटप करताना वयस्कर लोकांचे अंगठे मॅच होत नाहीत. त्यामुळे एका दिवशी फक्त चार ते पाच जणांनाच वाटप होते. त्यासंदर्भात शासनाला निवेदन दिले आहे. मात्र, त्यावर अपेक्षित कार्यवाही होत नाही. हेच घोड आडलये मग बॅंकिंगचे व्यवहार कसे होणार?
- अशोकराव पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघटना 

Web Title: poss machine banking

टॅग्स