मोहोळ नगरपरिषदेत तीन महिन्यापासून स्थापत्य अभियंता हे पद रिक्त

मोहोळ नगरपरिषदेत तीन महिन्यापासून स्थापत्य अभियंता हे पद रिक्त

मोहोळ- मोहोळ नगरपरिषद प्रशासनात गेल्या तीन महिन्यापासून स्थापत्य अभियंता (बांधकाम विभाग) हे पद रिक्त असल्याने अनेक महत्वाची कामे रखडली आहेत तर शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. वेळेवर काम होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 45 हजार लोकसंख्या असलेल्या मोहोळ ग्रामपंचायतीचे गेल्या अडीच वर्षापुर्वी नगर परिषदेमधे रुपांतर झाले. तेव्हापासुन नगरपरिषद प्रशासनात अनेक महत्वाच्या अधिकाऱ्यांची वानवा आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातुन अत्यंत महत्वाच्या अशा स्थापत्य अभियंता या पदाचा पदभार अभिराज डिंगणे यांच्याकडे आहे.

गेल्या अनेक दिवसापासून ते मोहोळला फिरकलेच नाहीत. त्यामुळे रमाई आवास घरकुले, बांधकाम परवाने, तसेच महत्वाच्या कागदपत्रकावर स्वाक्षऱ्या ही कामे रखडली आहेत. वेळेत कामे होत नसल्याने कर्मचारी व नागरिक यांच्यात सारखा संघर्ष होत आहे. डिंगणे यांनी आठवड्यातुन दोन दिवस मोहोळला येणे अपेक्षित आहे. मात्र ते येत नाहीत 

स्थापत्य अभियंता हे गेल्या अनेक दिवसापासून मोहोळ ला न आल्याने मोठी अडचण झाली आहे . त्यांच्या  बाबतचा रितसर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्याचे एन. के. पाटील (मुख्याधिकारी मोहोळ नगरपरिषद) यांनी स्पष्ट केले आहे.

माझ्याकडे दुधनी व मैदर्गी नगर परिषदेचा पदभार आहे. त्यामुळे मी मोहोळला येऊ शकत नाही तरीही ज्या ठिकाणी फाईल उपलब्ध होईल त्या ठिकाणी सह्या करतो.- अभिराज डिंगणे (स्थापत्य अभियंता मोहोळ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com