
किल्लेमच्छिंद्रगड : १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाल्यानंतर देशात औद्योगिक क्रांतीला सुरवात झाली. जे सत्तेच्या जवळ होते त्यांनी साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्या उभ्या करून सत्ता आपल्या हातात कशी राहील याची काळजी घेतली. सरकारी उद्योगातून पैसा मिळविलेल्यानी प्रायव्हेट लिमिटेड, लिमिटेड कंपन्या स्थापन केल्या. जनतेच्या पैशावर खासगी ट्रस्ट निर्माण करून शासकीय अनुदान घेवून शाळा, कॉलेज , मेडिकल कॉलेज स्थापन करून जनतेला लुटले. यात जनतेचा पैसा आणि कर रूपाने भरलेल्या पैशातून अनुदान म्हणजे पुन्हा जनतेचा पैसा.