esakal | सोशल मीडियावरील अखेर 'ती' पोस्ट ठरली खरी
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray sarkar

- राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सरकार 
- तुम्ही काय शिकलात या निवडणुकीत?
- हार कधीही मानू नका
- अहंकार ठेऊ नका, सर्वांना विश्वासात घ्या

सोशल मीडियावरील अखेर 'ती' पोस्ट ठरली खरी

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

सोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला तेव्हा विश्वास बसणार नाही अशी सोशल मीडियावर पोस्ट फिरत होती. ती म्हणजे राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना सरकार स्थापन करणार. अखेर ती पोस्ट गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने खरी ठरली.

हेही वाचा : एकनाथ खडसे शिवसेनेच्या वाटेवर? राऊत म्हणतात 

विधानसभा निवडणूकीपूर्वी
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली. लोकसभेत भाजपने मिळवलेल्या यशामुळे राज्यातही पुन्हा भाजपचेच सरकार येईल, अशी भविष्यवाणी व्यक्त केली जाऊ लागली. त्यामुळे अनेक नेत्यांना विकासाची स्वप्ने पडू लागली. आणि अक्षरश: भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पुढार्यांना वेटींगमध्ये थांबावे लागले. काहीजण शिवसेनेतही गेले. आशा स्थितीत वाढलेल्या आत्मविश्वासाने भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमितशाहांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यात सभा घेतल्या. जिल्ह्यातही अनेक नेत्यांच्या सभा झाल्या. या निवडणूकीत भाजप व शिवसेनेकडून उमेदवारी मिळावी म्हणून राष्ट्रवादीला सोडून करमाळा मतदारसंघातील रश्मी बागल व बार्शी मतदासंघातील दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दिलीप माने यांनीही काँग्रेसला सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी सोलापूर मध्य मतदारसंघातून महेश कोठे व काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला.

हेही वाचा : हिच ती वेळ मी, उध्दव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की...

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते पाटील हे देखील राष्ट्रवादीपासून अलिप्त होते. राज्यासह जिल्ह्यात भाजप व शिवसेनेला विरोधी पक्ष देखील राहील की नाही अशी शक्यती होती. अनेकदा विरोधकही राहणार नाही, अशी टिका प्रचारात झाली होती. याशिवाय आणखी काही नेते महायुतीच्या वाटेवर होते. अशा स्थितीत काँंग्रेस, राष्ट्रवादी व इतर पक्षाच्या महाआघाडीविरुध्द महायुतीने निवडणूक लढवली.

निकालानंतरची स्थिती
राज्यात निकालानंतर शिवसेनेला ५६ व भाजपला १०५ जागा मिळाल्या. तर काँग्रेसला ४४ व राष्ट्रवादीला ५४ जागा मिळाल्या. निकल लागल्यापासून सोशल मिडीयावर भाजपशिवाय सरकार स्थापन करण्याच्या पोस्ट फिरत होत्या. त्यातच मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपची युती तुटली. तेव्हापासून कोणाचे सरकार येणार याची उत्सुकता लागली होती. भाजपने  प्रथम बहुमत नसल्याने सरकार स्थापन केले नाही. शिवसेनेनी वेळ वाढवून मागीतली होती. मात्र वेळेत सरकार स्थापन करता आले नाही. राष्ट्रवादीलाही सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण राज्यपालांनी दिले होते. मात्र कोणीच सरकार स्थापन न केल्याने राष्ट्रपती राजवट लागु झाली. 

हेही वाचा : शेतकर्यांना कर्जमाफीसह उद्योगांना चालना; वाचा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम

राष्ट्रपती राजवटीनंतर 
वेळेत सरकार स्थापन न झाल्याने राज्यात राष्टपती राजवट लागली. दरम्यान सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन करण्याच्या हालचाली वाढवल्या. मात्र शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या पाठिंब्याने भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सर्वांना धक्का दिला. त्यानंतर आक्रमकपणे महाविकास आघाडी न्यायालयात गेली. न्यायालयाच्या निकालानंतर पवार व फडणविस यांनी राजिनामा दिला.

ही होती सोशल मीडियावर पोस्ट
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर सोशल मीडियावर 'काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीचे सरकार' अशा पोस्ट फिरत होती. अखेर शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होऊन फिरणारी तीत्रपोस्ट खरी करुन दाखवली.

पवारांचा प्रचार
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आखलेली प्रचाराची रणनिती यशस्वी केली. सुरुवातीपासून शेतकरी, तरुण यांना त्यांनी विश्वास दिला. जोरदारपणे प्रचार केला. पडत्या पावसातही सभा घेऊन त्यांनी प्रचार केला. त्यांच्या सभांनाही गर्दी होऊन मतदार आकर्षीत होत गेला. त्यामुळे राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या जागा वाढल्या. 

हेही वाचा : उद्धव ठाकरेंचा शपथविधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्या

तुम्ही काय शिकलात?
यावेळची निवडणूक वेगवेगळ्या कारणाने गाजली आहे. अनेक घटना अनपेक्षित घडल्या. त्यामुळे सोशल मीडिवर एक पोस्ट फिरत आहे. ती म्हणजे
या निवडणुकीत आपण काय शिकलो : 

1. आयुष्या मध्ये कितीही समस्या आल्या तरी हार मानू नका : शरद पवार

2. केव्हाही कुठल्याही गोष्टींचा अहंकार करू नये, सर्व इथेच फेडावं लागते : फडणवीस

3. क्षमतेपेक्षा जास्त उड्या मारू नये, तेलही जाते आणि तूपही जाते : वंचित आघाडी

4. आपल्या क्षमतांचा कधीही विसर पडू देऊ नये, वेळ आले की आपली ताकद दाखवाता येते : शिवसेना

5. लढाई जिंकण्याची जिद्द असेल तर एक सैनिक पण पुरून उरतो : संजय राऊत

6. इतके कुणापुढे लाचार होऊ नये की, आपले अस्तित्व पुसून जावे : मित्र पक्ष

7. सुख दुःखात साथ देणाऱ्या मित्राच्या पाठीत खंजीर खुपसू नये : भाजप

8. दुसऱ्यासाठी खड्डा खनू नये, आपण त्या खड्ड्यात पडु शकतो : ईडी

9. राजकीय पक्षांसाठी भांडू नका ते केव्हाही एकत्र होऊ शकतात : कार्यकर्ते