

‘राव तेवढा ढापलेला कारखाना परत द्या’ असा पोस्टर भर चौकात लावल्यानं जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे.
esakal
Jat Sugar Factory Jayant Patil : जत शहरातील आठ प्रमुख चौकांत ‘...तेवढा ढापलेला साखर कारखाना परत द्या बरं का...’ या आशयाच्या मजकुरासह शहरात रविवारी (ता. २) मध्यरात्री अनोळखींनी व्यंग्यात्मक फलक लावल्याने खळबळ उडाली. पोलिसांचे ‘गुडमॉर्निंग’ पथक व नगरपरिषदेकडून तत्काळ फलक उतरविण्यात आले. निवडणुकीच्या तोंडावर जयंत पाटील व गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद टोकाला गेला आहे.