बटाटा जोमदार; पण पावसाची प्रतीक्षा! 

बटाटा जोमदार; पण पावसाची प्रतीक्षा! 

पुसेगाव - पुसेगाव व परिसरात यंदा दीड ते पावणेदोन हजार टन बटाटा लागवड झाली आहे. पोषक वातावरणामुळे बहुतांश बटाटा पिके जोमदार उगवली असली तरी योग्य वाढीबरोबरच रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांना वळिवाच्या मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. 

या बाबत शेतकऱ्यांनी सांगितले, पुसेगाव व परिसरामध्ये खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात बटाट्याची मोठी लागवड केली जाते. या वर्षी शेतकऱ्यांनी पावसाच्या आगमनानुसार दोन टप्प्यात पेप्सी, एटीएल, 1533, एफसी-3 या वेफर्ससाठी लागणाऱ्या दीड ते पावणेदोन हजार टन बटाटा बियाण्याची लागवड केली. जून महिन्यात पावसाला प्रारंभ झाल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात बटाटा लागवड केली, तर एक ते 15 ऑगस्ट या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांनी लागवड केली. सध्या या पिकाला वातावरण पोषक असल्याने बटाटा पीक जोमात आले आहे. पण, काही ठिकाणी या पिकावर लाल कोळी व करपासदृश रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी औषध फवारणी करून रोग आटोक्‍यात आणण्यात यश मिळवले. पहिल्या टप्प्यातील बटाटा पीक फुलोऱ्यात आले असून हा बटाटा एक महिनाभरात काढणीस येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील बटाटा दिवाळीपूर्वी काढता येणार आहे. सध्या, या परिसरात सातत्याने पावसाची उघडझाप सुरू असल्याने बटाट्यावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बटाट्यावरील रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या परिसरात वळिवाचा मोठा पाऊस होणे आवश्‍यक असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सद्य:स्थितीत बहुतांश कोल्डस्टोअरेज रिकामी झाली असल्याने बटाटा काढणीनंतर बटाटा साठवणुकीची सोय होणार आहे. त्यामुळे अपेक्षित दर मिळेपर्यंत बटाटा साठवणूक करणे शक्‍य होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

यंदा वातावरण चांगले राहिल्याने, तसेच पाऊस चांगला झाल्याने बटाट्याचे उत्पादन चांगले निघेल. दरही चांगला राहील, असा अंदाज आहे. 
- अशोक काटकर, बटाटा व्यापारी, पुसेगाव 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com