प्रकाश आंबेडकरांनी बारामती आणि पुण्यातून दिली यांना उमेदवारी

प्रकाश आंबेडकरांनी बारामती आणि पुण्यातून दिली यांना उमेदवारी

कोल्हापूर -  वंचित बहुजन विकास आघाडीतर्फे लोकसभेच्या पाच जागांची उमेदवारी काल येथे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहिर केली.  पुणे मतदारसंघातून विठ्ठल सातव, बारामती येथून नवनाथ पडळकर, सातारा मतदारसंघातून सहदेव ऐवळे, माढा येथून विजयराव हणमंत मोटे, सांगली येथून जयसिंग उर्फ तात्या शेंडगे यांच्या नावांची त्यांनी घोषणा केली.

हातकणंगले येथून एका उलेमांना उमेदवारी दिली जाणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले. काल कोल्हापूर येथे डाॅ. आंबेडकर यांची शिवाजी स्टेडियमवर सभा झाली. यामध्ये त्यांनी ही घोषणा केली. कोल्हापूरच्या जागेसाठी कोण उमेदवार असेल याची घोषणा मात्र त्यांनी केली नाही. 

मोठी गर्दी अन्‌ लखलखाट
सभेसाठी शिवाजी स्टेडियम गर्दीने भरले होते. खासदार असदुद्दीन ओवेसी येणार असल्याचे जाहीर झाले होते. त्यामुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, बेळगाव, निपाणी व सीमाभागातून लोक आले होते. ॲड. प्रकाश आंबेडकर बोलण्यास उभे राहताच सर्वांनी मोबाईलचे फ्लॅश चमकवीत स्टेडियमभर लखलखाट केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com