प्रकाश अांबेडकर जाती जातींमध्ये विष पेरत अाहेत - शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान 

सिद्धार्थ लाटकर 
बुधवार, 28 मार्च 2018

संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर काेणते ही खाेटे-नाटे अाराेप झाल्यास अाम्ही ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा शिवप्रतिष्ठानच्या धारकऱयांनी अाज साताऱा येथे दिला.

सातारा - शिवप्रतिष्ठानमध्ये धनगर, मराठा अगदी दलित समाजातील युवक अनेक वर्षांपासून कार्यरत अाहेत परंतु प्रकाश अांबेडकर जाती जातींमध्ये विष पेरत अाहेत. खर तर त्यांची चाैकशी हाेऊन त्यांना बेड्या घालाव्यात. यापुढे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर काेणते ही खाेटे-नाटे अाराेप झाल्यास अाम्ही ही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा शिवप्रतिष्ठानच्या धारकऱयांनी अाज साताऱा येथे दिला. दरम्यान गुरुजींवरील अन्याय दूर झाला नाही तर विधानभवनावर धडकू असा ही निर्धार धारकऱयांनी व्यक्त केला. 

कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत तसेच दंगलीच्या पुर्वनियोजित कटात प्रकाश आंबेडकरांचा सुद्धा सहभाग असावा या दृष्टीने चौकशी करावी आदी मागण्यांसाठी आज शिवप्रतिष्ठानने राज्यभरात मोर्चे काढले. सातारा जिल्हा शाखेने ही गांधी मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरीक सहभागी झाले होते. गांधी मैदानावर सकाळपासूनच जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिवप्रतिष्ठानचे धारकारी, नागरीक सातारा शहरात भगवे झेंडे आणि गांधी टोपी परिधान करुन छत्रपती शिवाजी महाराज की जय...भारतमाता की जय असा जयघोष करीत येत होते. मोर्चा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता तसेच पर्यायी रस्त्याने वाहतुक वळविली होती. प्रेरणामंत्र झाल्यानंतर मोर्चास प्रारंभ झाला. प्रकाश आंबेडकर यांच्या चौकशीची, अटकेची मागणी करीत शिवरायांच्या जयघोषात मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आले. त्यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर यांना निवेदन दिले.
 

Web Title: prakash ambedkar spreading hatred in society says shivpratishthan hindusthan