राष्ट्रपती प्रणव मुखर्जी एप्रिलमध्ये नगर दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

नगर - लष्कराच्या "कलर सेरेमनी'साठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 14 एप्रिल रोजी नगरला येणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी आज जिल्हा प्रशासन, पोलिस व लष्करी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची खास बैठक झाली.

राष्ट्रपती मुखर्जी यांच्या उपस्थितीत 15 एप्रिल रोजी लष्कराचा "कलर सेरेमनी' होणार आहे. या सोहळ्यासाठी ते 14 एप्रिल रोजी नगर येथे मुक्कामी येणार आहेत. लष्कराचा सोहळा झाल्यानंतर राष्ट्रपतींना लष्कराचे जवान मानवंदना देतील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने पुण्याकडे व तेथून विमानाने दिल्लीला रवाना होतील, असे सूत्रांनी सांगितले. या दौऱ्याबाबत नियोजनासाठी आज येथे झालेल्या बैठकीला राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन व राजशिष्टाचार विभागाचे सचिव बाजीराव जाधव, उपसचिव एन. एस. भोगे, विशेष पोलिस महानिरीक्षक (सुरक्षा) कृष्णप्रकाश, नगरच्या लष्करी विभागातील आर्मर्ड कोअर सेंटर अँड स्कूलचे कर्नल राजबीरसिंग, जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासन, पोलिस व लष्करी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: pranab mukherjee nagar tour in april