मोहोळ तालुक्याचं आणि आमचं जुनं नातं- प्रणिती शिंदे

राजकुमार शहा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

मोहोळ तालुक्याचं आणि आमचं फार जुनं नातं आहे कारण; सुशिलकुमार शिंदे यांना सर्वात जास्त मताधिक्य याच तालुक्यातून मिळालं व त्यांना केंद्रीय गृहमंत्री पद मिळाले. यामध्ये मनोहरभाऊंचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे सर्व मोहोळकरांचे मी आभारी आहे.
 

मोहोळ- मोहोळ तालुक्याचं आणि आमचं फार जुनं नातं आहे कारण; सुशिलकुमार शिंदे यांना सर्वात जास्त मताधिक्य याच तालुक्यातून मिळालं व त्यांना केंद्रीय गृहमंत्री पद मिळाले. यामध्ये मनोहरभाऊंचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे सर्व मोहोळकरांची मी आभारी आहे.

सोलापूर जि.प. चे अर्थ व बांधकाम सभापतीपद मोहोळ तालुक्याच्या वाट्याला आले ही खरंच भाग्याची गोष्ट असुन विजयराज यांचा वाढदिवस आज विविध उपक्रमांनी साजरा होत आहे याचे कारण म्हणजे त्यांनी सभापती झाल्यापासून तालुक्यात विकासाची गंगा आणली असल्याचे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी दिले.

शेटफळ (ता.मोहोळ) येथे माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (कला व विज्ञान), शेटफळचा 15 वा वर्धापनदिन आणि सोलापूर जि.प.अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांच्या 43 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकशक्ती शुगरचे संस्थापक अध्यक्ष मनोहर डोंगरे होते. तसेच, माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर, सुजाता डोंगरे, भीमाचे व्हाईस चेअरमन सतिश जगताप, जि.प.सदस्य तानाजी खताळ, माढा पं.स.सदस्य धनराज शिंदे, संतोष पाटील, माजी सभापती यशवंत नरूटे, पं.स सदस्य अशोक सरवदे, सुनिता भोसले, शारदा पाटील, डॉ.प्रतिभा व्यवहारे, बावीचे सरपंच मुन्नाराजे मोरे, राजेश पवार, सर्जेराव चवरे, सरपंच रंजना लवटे, उपसरपंच दत्तात्रय वागज आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: praniti shinde stament on mohol taluka