हक्काचा 'मध्य' मतदारसंघ सोडणार नाही : प्रणिती शिंदे 

Praniti Shinde
Praniti Shinde

सोलापूर : "शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर कुणी दावा करीत असला तरी मी हक्काचा मतदारसंघ सोडणार नाही, असे आमदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले. 

 केंद्रीय पातळीवरील कांग्रेसबरोबर माकपची आघाडी झाली तर, शहर मध्य हा मतदारसंघ माकपसाठी सोडावा, लोकसभेसाठी आम्ही कांग्रेसला मदत करू, अशी भूमिका माजी आमदार नरसय्या आडम यांनी घेतली आहे. या पार्शवभूमीवर आमदार शिंदे यांनी आपली भूमिक स्पष्ट केली. 

आमदार शिंदे म्हणाल्या,""मी या मतदारसंघात खूप कामे केली आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर माझाच दावा असणार आहे. इतरांसाठी हा मतदारसंघ सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात तशी स्थिती नाही. गेल्या दहा वर्षांत मी केलेल्या कामाच्या जोरावरच या मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ माझ्यासाठी योग्य असणार आहे.'' 

विधीमंडळात महिला आमदारांना बोलण्यास संधी दिली जात नाही, असे स्पष्ट करून शिंदे म्हणाल्या,""सरकारची भूमिका पाहता, आम्हाला बोलण्यासाठी प्रत्येकवेळी झगडावे लागते. महिलांना बोलण्यास संधी मिळू नये अशीच सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे. अशाही स्थिती आम्ही आमच्या मतदारसंघातील प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.''

"शहर मध्य'मध्ये रंगतदार निवडणूक 
सोलापुरातील शहर उत्तर, शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर यापैकी शहर मध्य मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होण्याची शक्‍यता आहे. सध्या या मतदारसंघात कांग्रेसकडून प्रणिती शिंदे, भाजपकडून पांडुरंग दिड्डी, मोहिनी पतकी, शिवसेनेकडून महेश कोठे, माकपकडून नरसय्या आडम आणि एमआयएमकडून तौफीक शेख यांच्या नावाची चर्चा आहे. हेच उमेदवार रिंगणात असतील तर जिल्ह्यातील सर्वाधिक रंगतदार निवडणूक या मतदारसंघातील असणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com