esakal | Sangli : प्रशासकीय इमारत स्वच्छतेसाठी प्रांताधिकाऱ्यांनीच हातात घेतला झाडू!
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

प्रशासकीय इमारत स्वच्छतेसाठी प्रांताधिकाऱ्यांनीच हातात घेतला झाडू!

sakal_logo
By
धर्मवीर पाटील,

इस्लामपूर : येथील पेठ रस्त्यावरील प्रशासकीय इमारतीचा परिसर स्वच्छ रहावा म्हणून खुद्द प्रांताधिकारी संपत खिलारी यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवली. त्यासाठी त्यांनी निमित्त साधले महात्मा गांधी जयंतीचे.

इस्लामपूर-पेठ रस्त्यावर तीन मजली इमारत आहे. याठिकाणी काही काळ तहसील कार्यालय आणि संबंधित अन्य कार्यालये कार्यरत होती. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तहसीलची नवी इमारत झाल्यानंतर तेथील कामकाज इकडे स्थलांतरित झाले. त्याठिकाणी फक्त उपअधिक्षक भूमी अभिलेख, उपअधिक्षक उत्पादन शुल्क व तालुका कोषागार अधिकारी या कार्यालयांचे कामकाज राहिले. तहसील कार्यालय स्थलांतरित झाल्याने तिकडची वर्दळ कमी झाली त्यामुळे परिसर गेले अनेक दिवसांपासून अस्वच्छ होता.

इमारतीमधील खोल्यांची स्वच्छता सोडली तर बाकी विशेष लक्ष दिले गेले नव्हते. याठिकाणी इमारतीच्या पार्किंग परिसरात काही दिवस पारधी कुटुंबे वास्तव्यास होती. त्यामुळे अधिकच अस्वच्छता असायची. प्रांत म्हणून महिन्यांपूर्वी संपत खिलारी यांनी इथली सूत्रे हातात घेतली. इमारतीच्या समोरचा बगीचा तात्काळ स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केले. काल गांधी जयंतीचे औचित्य साधून त्यांनी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना खाली उतरवले. स्वतः हातात झाडू घेऊन सर्वांसोबत स्वच्छता मोहीम राबवली. यापुढेही या मोहिमेत सातत्य ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत सकाळशी बोलताना प्रांताधिकारी संपत खिलारी म्हणाले, "प्रशासकीय इमारत परिसर गेले अनेक दिवस अस्वच्छ होता. कामाच्या निमित्ताने अनेक लोक ये-जा करतात. काही व्यसनी लोकांमुळे अस्वछता निर्माण झाली होती. आपले कार्यालय, आपला परिसर स्वच्छ रहावा आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शिस्त लागावी हा हेतू ठेवून स्वच्छता मोहीम राबवली. यापुढे दर महिन्यात एकदा हा उपक्रम होईल."

loading image
go to top