आमच ठरलंय अन्, जे ठरलंय ते लवकरच कळणार :  प्रशांत परिचारक

हुकूम मुलाणी 
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

''गत निवडणुकीत 80 हजार मतदारांनी मतदान केले त्यांच्या अपेक्षा काही असून त्या लोकांना वाऱ्यावर न सोडता यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार असून 'आमच ठरलंय, जे ठरलंय ते लवकरच कळणार'' असे सुचक विधान करत विधानसभा लढविणार असल्याचे संकेत आमदार प्रशांत परिचारक यांनी दिले.

मंगळवेढा : ''गत निवडणुकीत 80 हजार मतदारांनी मतदान केले त्यांच्या अपेक्षा काही असून त्या लोकांना वाऱ्यावर न सोडता यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार असून 'आमच ठरलंय, जे ठरलंय ते लवकरच कळणार'' असे सुचक विधान करत विधानसभा लढविणार असल्याचे संकेत आमदार प्रशांत परिचारक यांनी दिले.

म्हैसाळ योजनेमध्ये नव्याने पाच गावांचा समावेश झाला याची माहिती देण्यासाठी मंगळवेढा येथील पंढरपूर अर्बन बँकेच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.यावेळी बोलताना परिचारक म्हणाले की, ''आपण सहयोगी आमदार असून विधान परिषदेच्या पटलावर अपक्ष आमदार म्हणून नाव आहे. त्यामुळे भाजपात प्रवेश व उमेदवारीवर कार्यकर्त्यांशी बोलून त्या त्या प्राप्त परिस्थितीत योग्य निर्णय घेणार आहे. सध्या युतीची चर्चा सुरू असून हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटणार हे ही लवकरच स्पष्ट होणार आहे.''

युतीबाबत मुख्यमंत्र्यांचे भुमिका स्पष्ट आहे. त्यामुळे पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली. त्यामुळे अनेक प्रतिक्षेत राहू लागले त्यात काहींना हिरवा तर, काहींना रेड सिंग्नल मिळत आहे. म्हैसाळ योजनेत नव्याने कृष्णा कोयना उपसासिंचन योजनेत आसबेवाडी शिवनगी लवंगी येळगी सोड्डी या गावाचा समावेश झाला असून 474 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यासाठी जवळपास 11 कोटीचा खर्च येणार आहे. बंद पाईपलाईन पाणी बचत होणार असून ते बचत झालेले पाणी मारोळी व शिरनांदगी तलावात पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. या पाण्याचे श्रेय कुणाला यावर बोलताना ते म्हणाले की, ''मी याचे श्रेय घेत नसून आम्ही निमित्त मात्र आहे, या भागात शेतीच्या पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या जनतेचे आहे. यावेळी रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहूल शहा, शिवानंद पाटील, औदुंबर वाडदेकर,शिवाजी नागणे, युन्नुस शेख, अरूण किल्लेदार,रामकृष्ण नागणे प्यारेलाल सुतार, मधुकर चव्हाण मानवानंद आकळे, आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prashant Paricharak Talked about Upcoming Vidhansabha Election 2019