प्रशांतभाऊ, गौरी वहिनींचा बच्चन स्टाईल डान्स, विद्यार्थी अवाक

PRASHANBAHU GADAKH BACCHAN STYLE DANCE
PRASHANBAHU GADAKH BACCHAN STYLE DANCE

नगर ः जिल्ह्याच्या तसेच राज्याच्या राजकारणात गडाख कुटुंबाने वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचसोबत समाजकारण आणि साहित्य क्षेत्रातही घराणे अग्रेसर आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांच्या अंगी हे अष्टपैलत्त्व आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत चिरंजीव प्रशांत पाटील गडाख चालत आहेत.

राज्यभरातून दाद

नेत्रदान चळवळीत त्यांनी मोठे काम केले आहे. अनेकांच्या अंधाऱ्या जीवनात त्यांच्यामुळे प्रकाश आला आहे. त्यांचे साहित्यावरील प्रेम सर्वश्रुत आहे. नुकत्याच झालेल्या वाढदिवशी त्यांनी पुस्तक भेट हा उपक्रम राबवविला. त्यास उदंड प्रतिसाद मिळाला. गाव तेथे वाचनालय या उपक्रमासही दाद मिळत आहे. कलेवरही त्यांचे तेवढेच प्रेम आहे.ज्ञानेश्वर कॉलेजच्या गॅदरींगवेळी त्यांचे हे कलाप्रेम दिसले. त्याचीच चर्चा राज्यभर आहे.

हुबेहूब अमिताभ...

मुळाच्या एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थी आपले कलागुण दाखवित होते. त्यांनी संस्थेचे अध्यक्ष असलेल्या प्रशांतभाऊ आणि गौरी वहिनींना नृत्य करण्याचा आग्रह धरला. मग प्रशांतभाऊ यांनी हुबेहुब बच्चन यांचा अभिनय करीत रंग बरसे भिगे चुनरवाली... या गाण्यावर अप्रतिम नृत्य सादर केले. त्यांची पत्नी गौरी यांनीही त्यांना तेवढीच साथ दिली.

मुरब्बी स्टेपस

हे नृत्य केवळ एखाद्या कडव्यापुरते नव्हते संपूर्ण गीतावर त्यांनी अदाकारी केली. या बच्चनस्टाईलने विद्यार्थीही अवाक झाले. कारण एखाद्या मुरब्बी डान्सरसारख्या त्यांच्या स्टेप होत्या.

विद्यार्थ्यांनीही धरला ठेका
आपले संस्थाप्रमुखच नृत्य करीत आहे असे दिसल्यावर विद्यार्थीही त्यांच्यासोबत नृत्य करू लागले. प्रशांतभाऊ यांनी नेहमीच विद्यार्थ्यांमधील कलागुण जोपासण्यासाठी विविध उपक्रम राबवविले. विद्यार्थ्यांना ते कधीच परके वाटत नाही किंवा एक संस्थाप्रमुख म्हणूनही दडपणही नसते. त्यामुळे मुळाचे विद्यार्थी विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत.

सामाजिक कामही थोर

प्रशांतभाऊ यांनी गरीब घरातील विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे. त्यांच्यासाठी अभ्यास केंद्रही चालवितात. त्यातून शेकडो विद्यार्थी नोकरी लागले आहेत. त्यांना रोजगाराभिमुख शिक्षण दिल्याने ते आत्मनिर्भर झाले आहेत.
प्रशांतभाऊ हे जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू आहेत. त्यांनी केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आणि त्याला लाइक मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com