माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी घेतली पडळकरांची भेट

नागेश गायकवाड
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

आटपाडी - लोकसभा निवडणूकीचे जिल्हयाला वेध लागलेले असतानाच माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर यांची झरे येथील रेस्टहाऊसवर भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणूकीवर एक तासभर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत दोघांचाही सुर जुळल्याची चर्चा आहे. 

आटपाडी - लोकसभा निवडणूकीचे जिल्हयाला वेध लागलेले असतानाच माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी स्टार प्रचारक गोपीचंद पडळकर यांची झरे येथील रेस्टहाऊसवर भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणूकीवर एक तासभर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत दोघांचाही सुर जुळल्याची चर्चा आहे. 

सांगली जिल्हयाला लोकसभा निवडणूकीचे वेध लागलेत. भाजपाचे खासदार संजय पाटील यांनी मुख्यमंत्र्याचा नागज येथे मेळावा घेऊन निवडणूकीचे रणशिंग फुकले आहे. खासदार पाटील यांच्या विरोधात अद्याप उमेदवार निश्‍चित नाही. एकमेव स्टार प्रचारक श्री. पडळकर यांनी खासदारावर काही महिन्यापासून हल्लाबोल सुरू केला आहे. 

लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने काँग्रेसच्या गोटात हालचाल सुरू झाली आहे. मुंबईत पक्षश्रेष्ठीच्या बैठकीतही श्री. पडळकर यांच्यावरच अधिक चर्चा झाल्याचे वृत्त आहे. यानंतर काही दिवसापुर्वी आमदार विश्‍वजित कदम  आणि श्री. पडळकर यांची कडेगाव येथे बैठक झाली. ते काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. काँग्रेसने पक्षात येण्याचे निमंत्रण दिल्याचे बोलले जाते मात्र श्री. पडळकर यांच्याकडून अदयाप भूमिका स्पष्ट झालेली नाही. 

लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने जिल्हयाचे लक्ष झरेकडे लागले आहे. श्री. पडळकर यांची भूमिका जाणून घेण्यासाठी आणि निवडणूकीवर चर्चा करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी काल सांयकाळी झरे येथे रेस्टहाऊसवर भेट घेतली. श्री. पडळकर यांनी त्यांचे स्वागत केले. ही भेट नियोजितच होती. या भेटीत लोकसभा निवडणूक, धनगर आरक्षण लढा, जिल्हयाचे  राजकारण आदीवर सविस्तर चर्चा झाली. दोघांनीही जिल्ह्याच्या विकासासाठी योग्य ती एकत्रित भूमिका घेण्याचे एकमत झाले. तासभर चर्चा झाली. या बैठकीतून दोन्ही नेत्यांचा सुरू जुळला आहे. 

नविन वर्षात दुसरी बैठक 
श्री. पडळकर यांनी माजी मंत्री श्री. पाटील यांना नविन वर्षात जेवणासाठी येण्याचे निमंत्रण दिले. या बैठकीत पुढील दिशा आणि भूमिका अधिक स्पष्ट करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे काही दिवसांनी होणाऱ्या या बैठकीकडे अत्तापासूनच लक्ष लागले आहे. 

Web Title: Pratik Patil meets Gopichand Padalkar in Zhare