मंगळवेढा : प्रतीकच्या मारेकऱ्यांना अटक होण्यासाठी आंदोलन

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा : प्रतीकच्या मारेकऱ्यांना अटक करावी व  पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व अन्य मागण्यासाठी जनहीत शेतकरी संघटनेच्या वतीने असलेल्या आंदोलनस्थळी माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील भेट देवून आंदोलनाचा पाठिंबा व्यक्त केला. दरम्यान या मतदारसंघाचे खासदार शरद बनसोडे यांनी मात्र टाळले.

यावेळी आंदोलक प्रभाकर देशमुख, दामाजी मोरे, बलभिम माळी, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहूल शहा, सोमनाथ माळी, भारत पाटील, तानाजी खरात, पी.बी.पाटील, रामेश्वर मासाळ, बाबा कौडूभैरी, काशीनाथ पाटील, महावीर ठेंगील, भारत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी व जनहीतचे पदाधिकारी उपस्थित होते.

नदीकाठच्या सधन पट्यात प्रतीकचे अपहरण होऊन दोन आठवडे झाले तरी मारेकय्राचा शोध लावण्यास पोलिसांच्या चार पथकाला अद्यापही ही यश आले नाही. स्थानिक गावकऱ्यांकडून माहिती घेतली जात असून काही जणाकडून तपासही केला पण आरोपीबाबत पोलीसाकडून अद्यापही स्पष्टीकरण दिले नाही. फक्त पोलिस तपास सुरू असल्याचे सांगितले जाते पण प्रत्यक्ष आरोपीला कधी करणार याविषयी मात्र पोलिस खात्याकडून सांगितले जात नाही. त्यामुळे शिवशरण कुटुंबीयांमध्ये पोलिस खात्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे . दरम्यान जनहीत शेतकरी संघटनेने हा तपास सीआयडीकडे वर्ग करावा अशी मागणी यापूर्वीच केली आहे. पोलिस खात्याची निष्क्रियतेवरून उद्या मंगळवेढा बंद तर सोमवारी रास्ता रोको करण्याचा इशाराही दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com