प्रतिक मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - भारत भालके 

हुकूम मुलाणी
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

मंगळवेढा - शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हत्येच्या घटनाचे प्रमाण वाढले असून, प्रतिक आपल्या कुटुंबातला मुलगा आहे. त्याच्या हत्येतील मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारा भारत भालके यानी दिला.

मंगळवेढा - शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हत्येच्या घटनाचे प्रमाण वाढले असून, प्रतिक आपल्या कुटुंबातला मुलगा आहे. त्याच्या हत्येतील मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा इशारा भारत भालके यानी दिला.

येथील दामाजी चौकात सर्व पक्षीय रास्ता रोको प्रसंगी ते बोलत होते. या वेळी यावेळी, शिवसेना तालुका प्रमुख येताळा भगत, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, नगरसेवक प्रवीण खवतोडे, राहुल सावंजी, आर.पी.आयचे अशोक शिवशरण, धनंजय खवतोडे, विजय खवतोडे, भीमराव मोरे, मारुती वाकडे, युवराज शिंदे, महेश दत्तू नाथा ऐवळे, पोपट पडवळे, प्रताप सावंजी, बाबा कौडुभैरी प्रकाश सावंत चिमाजी कसबे नितीन सोनवले मैनीनाथ खरबडे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आर पी आय सर्व गट सह सहभागी झाले.

यावेळी बोलताना भालके म्हणाले की, माचणूर परिसरातील लहान मुले आज भयभीत असून, गेल्या तीन वर्षात नंदूरचा अमीर मुलाणी नरबळी झाला याशिवाय अन्य काही मुले अपहरण झालेली आहेत. त्याचा तपास अद्याप लागलेला नाही सतरा दिवस झाले तरी अद्याप पोलीस यंत्रणा काही सांगत नाही प्रतीक शिवशरण कुटुंबियाच्या भावनेचा अंत किती दिवस पाहणार आहात या भागातील पोलिस अधिकारी मस्तवाल झाले अतिरिक्त पोलिस अधीक्षकांची एक टीम तयार करावी गुन्हे अन्वेषण शाखेचे शाखेचे कुंभार यांची बदली रद्द करून त्यांना या कामात पूर्ण वेळ द्यावा याबाबत जिल्हाधिकार्‍यांना सूचना दिल्या असून हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार आहे. या रास्ता रोको आंदोलनात सोलापूरचे माजी नगरसेवक अरुण भालेराव जितेंद्र बनसोडे सोमनाथ भोसले चंद्रकांत वाघमारे कुमार भोसले सुनिल सर्व्गोड़ यानीही भावना व्यक्त केल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pratik's killers should get death penalty - bharat bhalke