esakal | निपाणीत ३९७ सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना
sakal

बोलून बातमी शोधा

paschim Maharashtra

निपाणीत ३९७ सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना

sakal_logo
By
अमोल नागराळे

निपाणी : निपाणी (Nipani) मंडळ पोलिस (Police) निरीक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या चार पोलिस स्थानक हद्दीत यंदा ३९७ सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाली आहे. निपाणी शहर, ग्रामीण, श्री. बसवेश्र्वर (Baseshwar) चौक व खडकलाट या चारही पोलिस स्थानकातून असंख्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यानी सार्वजनिक गणेश मूर्ती परवाना (License) घेतले आहेत, तर अद्याप काही मंडळाकडून परवाने घेतले जात आहेत.

चारही पोलिस स्थानक हद्दीत निपाणी ग्रामीण पोलिस स्थानक हद्दीत सर्वाधिक म्हणजे २३३ गणेश मूर्तींची प्रतिष्ठापणा झाली आहे. यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सार्वजनिक गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी परवाना देणार नव्हते. मात्र सशर्थ परवानगीव्दारे सार्वजनिक उत्सव साजरा केला जात आहे. निपाणी पोलिस निरीक्षक कार्यालय अंतर्गत येणाऱया निपाणी ग्रामीण कार्यालयाचे कार्यक्षेत्र मोठे आहे. जवळपास ३० हून अधिक गावांच्या बंदोबस्ताची जबाबदारी ग्रामीण स्थानकाला पार पाडावी लागते. निपाणी शहर कार्यालयाला निपाणी शहरातील काही भाग व डोंगरी भागातील काही खेड्यांवर नियंत्रण ठेवावे लागते.

हेही वाचा: निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी; वाहतूक बंद

श्री बसवेश्वर चौक पोलिस स्थानक हद्दीत निपाणी शहराचा काही भाग व अन्य काही खेडी मिळून जवळपास १५ गावांवर लक्ष ठेवावे लागते. खडकलाट पोलिस स्थानक हद्दीत १० वर खेड्यांचा समावेश आहे. निपाणी भागात गणेशोत्सवाचे मोठे आकर्षण असल्याने सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना महिनाभर अगोदर उत्सवाची चाहूल लागलेली असते. यंदा कोरानामुळे सार्वजनिक उत्सवावर निर्बंध आल्यावर मंडळाच्या कार्यकर्त्यांचा त्याला विरोध झाला. अखेर प्रशासनाने सार्वजनिक उत्सवाला परवाना द्यावा लागला. प्रशासनाने नियम, अटीसह उत्सवाला परवाना दिल्याने नियमांचा भंग करणाऱयांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने मनुष्यबळ विभागणीसह बंदोबस्ताचे नियोजन चालविले आहे. संवेदनशील, अतिसंवेदनशील अशा गावांसह तेथील मंडळांची यादी प्रशासनाकडून बनवली जात आहे. त्यानुसार बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

निपाणी तालुक्यातील भाटांगनूर या गावात अनेक वर्षापासून एक गाव, एक गणपती उपक्रम राबविला जातो. तालुक्यातील अनेक गावात एक गाव, एक गणपती चा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यात सातत्य राहिले नाही. भाटनांगनूरच्या गावकऱयांनी एक गाव, एक गणपती चा उपक्रम कायम ठेवला आहे.

हेही वाचा: निपाणी : विवाहितेचा नदीत पडून मृत्यू, भाट नांगनूरातील घटना

विविध गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी परवाने नेले आहेत. अद्याप काहीजण नेणार आहेत. श्री. बसवेश्वर चौक पोलिस स्थानक हद्दीत ६४ तर खडकलाट हद्दीत ८० सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. उत्सव काळात बंदोबस्ताचे नियोजन सुरु आहे.

-कृष्णवेणी गर्लहोसूर

पोलिस उपनिरीक्षक, बसवोश्र्वर चौक पोलिस स्थानक

loading image
go to top