"प्रवरा'च्या विद्यार्थ्यांची कार राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल! 

Pravara's student car tops national competition
Pravara's student car tops national competition

शिर्डी :लोणी येथील प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या इलेक्‍ट्रिक कारला तमिळनाडूतील "करी मोटार स्पीड वे' येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले.

प्राचार्य डॉ. संजय गुल्हाणे यांनी ही माहिती दिली. 
ते म्हणाले, की मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. राजेंद्र खर्डे, प्रा. पद्माकर कडबुके व प्रा. नीलेश मानकर यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. देशभरातील तीस महाविद्यालयांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.

यापूर्वी ही कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पर्धेत अव्वल ठरली होती. विद्यार्थी प्रद्युम्न घोरपडे व वैभव सोनावणे यांनी ही कार तयार करणाऱ्या पंचवीस विद्यार्थ्यांच्या चमूचे नेतृत्व केले.

चालक म्हणून लॉरेन्स बनसोडे याने ही कार स्पर्धेत उतरविली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी या कारची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

प्रवराच्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवला आहे. क्रीडा स्पर्धांमध्येही त्यांनी चमक दाखवली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com