मुलांवर उपचाराची साधनसामग्री सज्ज ठेवा : जयंत पाटील

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बाधित होण्याचा दर ११ टक्क्यांपर्यंत खाली आला
मुलांवर उपचाराची साधनसामग्री सज्ज ठेवा : जयंत पाटील
Updated on

सांगली : कोरोनाच्या संभाव्य (covid-19) तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका (fear of third stage for child) असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. लहान बालकांसंबधीची आवश्यक माहिती आतापासूनच तयार करा. उपचारासाठी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (medical college) आणि रुग्णालयात १० निव्होनेटर व्हेंटिलेटर खरेदीची प्रक्रिया राबवावी. लहान मुलांना कोविडनंतर मल्टि सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमचा (MISC) धोका होण्याची अधिक शक्यता असते. यासंबंधीचा औषध साठा उपलब्ध करून ठेवा, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. (jayant patil)

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. खासदार संजय पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले, अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे उपस्थित होते.

मुलांवर उपचाराची साधनसामग्री सज्ज ठेवा : जयंत पाटील
किरकोळ वादातून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी; इचलकरंजीतील घटना

मंत्री पाटील म्हणाले, ‘‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बाधित होण्याचा दर ११ टक्क्यांपर्यंत खाली आला. हे दिलासादायक चित्र आहे. हा दर आणखी खाली आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील रहावे. कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत आहे. म्युकरमायकोसिस (mucor-mycosis) रुग्णसंख्या आटोक्यात राहण्यासाठी प्रयत्न करा. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिलासादायक असली तरीही राज्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे. येत्या काळात सुधारणा होऊन वरील टप्प्यात जाण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील रहावे.’’

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजना, ऑक्सिजन पुरवठा, (oxygen bed)राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार प्रतिबंधात्मक आदेशाच्या अंमलबाजावणीची सविस्तर माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हापरिषदेच्या माध्यमातून ग्रामीणस्तरावर सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

मुलांवर उपचाराची साधनसामग्री सज्ज ठेवा : जयंत पाटील
‘अतिरिक्त सहाय्यक संचालक’; तालुका पंचायतीत नवे पद

जानेवारीपासून ५ लाख चाचण्या

जानेवारीपासून सुमारे ५ लाख १६ कोरोना चाचण्या झाल्या. सद्यस्थितीत दिवसाला ७ ते ८ हजार चाचण्या होतात. त्याचेही प्रमाण वाढवावे. कोरोनाचा कहर काही अंशी कमी आला असला, तरी जनतेने मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आदेश मंत्री श्री. पाटील दिले.

ऑक्सिजन मागणीत घट

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा दर कमी आल्यामुळे दिवसाला ५३ टन ऑक्सिजनची आवश्यकता भासत होती. ती कमी होऊन ३४ टनावर आली आहे, अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com