esakal | श्रीगोंदेकरांची वाढली धाकधुक... शिक्रापूरच्या कोरोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कात आली गर्भवती
sakal

बोलून बातमी शोधा

corona suspected woman in shrigonda

शिक्रापुर येथील सोनोग्राफी करणाऱ्या एका डाॅक्टरने कहर केला. दोन दिवसात दीडशे रुग्णांची सोनोग्राफी करण्याचा उच्चाक करणारा हा डाॅक्टरच अखेर कोरोनाबाधित निघाला. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्ण व इतर लोकांचे सर्व्हेक्षण सुरु झाले.

श्रीगोंदेकरांची वाढली धाकधुक... शिक्रापूरच्या कोरोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कात आली गर्भवती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : शिक्रापुर (जि. पुणे) येथील एक डाॅक्टरच कोरोनाबाधित आढळल्याने सगळीकडे खळबळ उडाली. त्या डाॅक्टराच्या संपर्कात १४४ रुग्ण आल्याची माहिती पुढे आल्याने त्या लोकांना शोधण्याचे काम सुरु आहे. त्यातच आता श्रीगोंद्यातील एक गर्भवती महिलाही त्या डाॅक्टरकडे तपासणीसाठी गेल्याची खळबळजनक माहिती हाती लागली आहे. त्यामुळे ही महिला आणि तिच्या पोटातील बाळ कोरोना संशयीत असण्याची भिती व्यक्त होत आहे.

हेही वाचा - दरोडेखोरांना तिच्या लेकीवर करायचा होता अत्याचार

शिक्रापुर येथील सोनोग्राफी करणाऱ्या एका डाॅक्टरने कहर केला. दोन दिवसात दीडशे रुग्णांची सोनोग्राफी करण्याचा उच्चाक करणारा हा डाॅक्टरच अखेर कोरोनाबाधित निघाला. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्ण व इतर लोकांचे सर्व्हेक्षण सुरु झाले.

दरम्यान, त्या डाॅक्टरकडे गेलेल्या यादीत आता श्रीगोंद्यातील एका महिलेचे नाव पुढे आले आहे. सदरची महिला गर्भवती आहे. सोनोग्राफी तपासणीसाठी त्या तज्ज्ञ डाॅक्टरकडे जावून आल्याचे खात्रीशिररित्या समजले आहे. अर्थात ती महिला सध्या केवळ संशयीत आहे. तिचे सासर पुणे जिल्ह्यातील आहे. माहेर श्रीगोंद्यातील आहे. ती काही दिवसांपुर्वीच येथे आल्याची माहिती आहे. या महिलेच्यासंपर्कात आलेल्यांनी धास्ती घेतली आहे. काहीजणांनी तर दुसरीकडे स्थलांतर केले आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितीन खामकर यांनी दुजोरा दिला. त्या महिलेची माहिती मिळाली आहे. तीची तातडीने तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवानगी करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

loading image
go to top