मोहोळ: लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची जनसंपर्कास सुरवात

kambale
kambale

मोहोळ : सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातील जुने कार्यकर्ते आता जागे झाले असुन, त्यांनी मतदार संघातील कार्यकर्ते व मतदारांशी संपर्क सुरू केला आहे. दरम्यान भाजपाचे नेते व दोन वेळा लोकसभेची निवडणुक लढविलेले प्रा. चांगदेव कांबळे यांनी गुरुवारी मोहोळ येथे शहरातील ग्रामदैवत नागनाथ महाराजांचे दर्शन घेऊन जनसंपर्क सुरू केला आहे.

प्रा. कांबळे हे गेल्या 32 वर्षापासून पंढरपूर येथील  महाविद्यालयात मराठी अध्यापनाचे काम करीत आहेत. प्रा कांबळे यांनी सन 1996 ला सोलापुर लोकसभा निवडणुक लढविली होती, त्यावेळी त्यांना एक लाख छ्पन्न हजार मते मिळाली  होती, तर सन 1998 ला लढविलेल्या निवडणुकीत दोन लाख बेचाळीस हजार मते मिळाली होती. त्यावेळी भाजपाचा झेंडा घेऊन फिरण्याचीही भिती होती. ज्या वेळी पक्षाला उमेदवार मिळत नव्हता, त्यावेळी मी निवडणुक लढविली, मात्र आता पक्षाला अच्छे दिन आले आहेत . गेल्या एक वर्षापासुन मी मतदारांच्या संपर्कात असुन निवडणुक लढविण्याबाबत व उमेदवारी बाबत पक्षश्रेष्ठीशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. कुणाशी चर्चा झाली याबाबत विचारले असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला.

अनूसुचीत जातीसाठी एकूण 48 मतदार संघ आरक्षीत आहेत, त्या पैकी सोलापूर व शिर्डी या  मतदार संघाची मातंग समाजासाठी मागणी केल्याचे कांबळे यांनी सांगितले. जुन्या कार्यकर्त्यांचा संच माझ्याकडे आहे. केंद्र व राज्य सरकारने सर्व सामान्यासाठी केलेली कामे हीच माझ्या जिंकण्याची शिदोरी असल्याचे त्यांनी सांगितले. मी मतदार संघात नवीन नाही, या भागातील काय अडचणी आहेत असेही याची मला जाण असल्याचे प्रा. कांबळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com