एक जानेवारीपासून शाळा सुरू करण्यासाठी जोरदार तयारी 

Preparing to start school from January one
Preparing to start school from January one

बेळगाव : कोरोनाचे संकट दूर करत शिक्षण खात्याने एक जानेवारीपासून शाळा सुरु करण्याची जोरदार तयारी केली आहे. शिक्षकांच्या कोरोना चाचणीचे काम सुरु आहे. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांचे दररोज थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी मशिन खरेदी करण्याची सूचनाही शाळांना करण्यात आली आहे. 


मार्च महिन्यात लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाल्या होत्या त्यानंतर पुन्हा एकदा शाळा सुरु होणार आहेत. त्यामुळे शिक्षण खात्याची जबाबदारी वाढली असून ग्राम पंचायत, नगर पालीका व महापालीकेच्या माध्यमातून शाळांची स्वच्छता करण्यात येत असून 31 डिसेंबरपूर्वी सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच तालुका पंचायत व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तालुक्‍यातीलड काही शाळांची पाहणी करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांचे दररोज थर्मल स्क्रिंनिंग केले जाणार आहे. यासाठी शाळांना थर्मल मशिन खरेदी करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार शाळांकडून मशिन खरेदी केली जात आहे. शाळा सुरु झाल्यानंतर आवश्‍यकता भासल्यास स्थानिक स्वराज्य संस्थाची मदत घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे. शाळेतील शौचालयांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करुन द्यावे तसेच दररोज स्वच्छता करावी असे कळविण्यात आले आहेत. त्यानुसार शाळांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. 

शाळांना सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस सकाळी व दुपारच्या सत्रात फक्‍त तिन ते 4 तास शाळा घेतली, जाणार आहे. त्यामुळे त्या प्रकारे शिक्षकांना अभ्यासाचे नियोजन करावे लागणार आहे. 

शाळांसाठी पुढील प्रमाणे नियमावली लागू करण्यात आली आहे 


1. विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग दररोज करावे 
2. सर्दी ताप असल्यास विद्यार्थ्यांने घरीच रहावे 
3. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांचे वर्गीकरण 
4. शाळेला हजर राहु शकत नसलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण 
5. एका खोलीत 20 विद्यार्थ्यांची सोय करावी 
6. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे 
7. विद्यार्थी परगावी असल्यास तेथील नजिकच्या शाळेत त्याला शिक्षण घेता येईल 
8. ग्राम पंचायत. नगर पंचायत व महापालीकेने शाळांचे निर्जंतुकीकरण करावे 
9. विद्यार्थ्यांनी घरातुन पाणी घेऊन यावे 
10. शाळेत स्वच्छ पाणी उपलब्ध करुन द्यावे 
11. 50 वर्षांहुन अधिक वयाच्या शिक्षकांनी काळजी घ्यावी 
12. कोरोना नियमांचे पालन करणे आवश्‍यक 


सकाळचे सत्र 
एक जानेवारीपासुन सुरु होणाऱ्या शाळेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे असणार आहे. 
सकाळी 10 ते 10.45 पहिला तास, 10.45 ते 11.30 दुसरा तास, 11.30 ते 11.45 मधली सुट्टी 11.45 ते 12.30 तिसरा तास, 12.30 ते 1.15 चौथा तास 
दुपारचे सत्र 
2 ते 2.45 पहिला तास, 2.45 ते 3.30 दुसरा तास 3.30 ते 3.35 मधली सुट्टी, 3.45 ते 4.30 तिसरा तास 
 
विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी होणार नाही मात्र विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग होणार आहे. यासाठी सरकारी शाळांनी उपलब्ध अनुदानातुन मशिन खरेदी करण्याची सुचना करण्यात आली आहे. तर खाजगी शाळांना स्वत : हुन मशिन खरेदी करावी लागणार आहे. शिक्षकांनी सर्व प्रकारची काळजी घेणे आवश्‍यक आहे. 

-ए. बी. पुंडलीक, जिल्हा शिक्षणाधिकारी
  

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com