Bailgada Sharyat : नाद एकच बैलगाडा शर्यत! शर्यतीसाठी पळणाऱ्या बैलांच्या किमतीत वाढ; 50 हजारपासून 15 लाखांपर्यंत किंमत

बैलगाडी शर्यत हा ग्रामीण भागातील एक अत्यंत चुरशीची स्पर्धा मानली जाते.
Bullock Cart Race
Bullock Cart Raceesakal
Summary

शर्यतीसाठी पळणाऱ्या बैलांची किंमत ५० हजार पासून पंधरा लाख रुपये पर्यंत असल्याचे संयोजक सांगतात.

Ghatnandre: सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडा शर्यतीस (Bullock Cart Race) परवानगी दिल्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात बैलगाडी शर्यतींना वेग आला आहे. शर्यतीसाठी पळणाऱ्या बैलांची किंमत व मागणी वाढू लागली आहे.

बैलगाडी शर्यत हा ग्रामीण भागातील एक अत्यंत चुरशीची स्पर्धा मानली जाते. ग्रामीण भागात बैलगाडी शर्यती मोठ्या प्रमाणात होत आहेत. ग्रामीण भागात बैलांची संख्या जरी कमी असली तरी शर्यतीसाठीच्या बैलांची संख्या जास्त आहे.

विना लाठी विना काठी या तत्त्वावर शर्यतींचे आयोजन करण्यात येते. बैलगाडी शर्यतीसाठी स्पर्धक वेगवेगळ्या भागातून सहभागी होतात. शर्यतीसाठीची बक्षीसे सुद्धा पाच ते दहा हजारापासून लाख रुपये पर्यंत असतात. शर्यतीसाठी प्रामुख्याने खिलारी बैलांचा वापर केला जातो.

Bullock Cart Race
NCP News: मुस्लिम समाजाला राष्ट्रवादीकडं खेचण्यासाठी जोरदार हालचाली; शरद पवारांना पाठिंबा देणारे 'मुकादम' दादांच्या गोटात!

कवठेमहांकाळ तालुक्यात वेळोवेळी यात्रा, वाढदिवसाचे औचित्य साधून अशा शर्यतीचे शौकीनाकडून आयोजन करण्यात येते. या शर्यतीसाठी कुची, जाखापूर, करोली (टी) शिरोळ, कोल्हापूर, शिरूर, अनंतपूर, दानोळी, जयसिंगपूर, डफळापुर, नागोळे, सांगली, अंकले, बाज, खिळेगाव, पांडेगाव, लंगरपेठ, मणेराजुरी आदी भागातून बैलगाड्या शर्यतीमध्ये सहभागी होतात.

Bullock Cart Race
Dudhsagar falls Video : दूधसागर धबधबा पाहायला जाताय? मग ही बातमी आधी वाचा, अन्यथा उठाबशा काढाव्या लागतील! व्हिडिओ व्हायरल

शर्यतीसाठी पळणाऱ्या बैलांची किंमत ५० हजार पासून पंधरा लाख रुपये पर्यंत असल्याचे संयोजक सांगतात. साधारणपणे एक वर्षाच्या बैलापासून पळावू बैल शर्यतीसाठी तयार केले जातात. शर्यतीसाठी बैलांचा दररोज सराव घेतला जातो. शर्यतीच्या पळणाऱ्या बैलांसाठी मटकी, सातू, हरभरा, अंडी, उडीद, शेळीचे दूध असा आहार दिला जातो. शर्यतीच्या बैलांची पशुपालक शेतकरी मुलाप्रमाणे काळजी घेतात.

Bullock Cart Race
NCP Crisis : 'करेक्ट कार्यक्रम व्हायचा नसेल तर दादांकडं या'; जयंत पाटलांवर निशाणा साधत कोणी दिला इशारा?

बैलांना जोपासण्यासाठी भरपूर खर्च केला जातो. लहान बैलासाठी दैनंदिन किमान पाचशे रुपये तर मोठ्या बैलासाठी किमान एक हजार रुपये दैनंदिन खर्च केला जातो. या पळणाऱ्या बैलांसाठी किमान सहा महिन्यातून एकदा लोणी, सोनकाव या पदार्थांनी शरीराची मसाज केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com