डिजिटल शाळेसाठी गतिमान पावले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

सातारा - आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाचा आधार घेत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद वेगाने पावले उचलत आहे. जिल्हा परिषदेच्या तब्बल ७० टक्‍के प्राथमिक शाळांत आता डिजिटल क्‍लासरूम उपलब्ध असून, त्याद्वारे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शैक्षणिक वर्षात १०० टक्‍के शाळा डिजिटल करण्याचा मानस जिल्हा परिषदेचा आहे. 

सातारा - आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाचा आधार घेत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद वेगाने पावले उचलत आहे. जिल्हा परिषदेच्या तब्बल ७० टक्‍के प्राथमिक शाळांत आता डिजिटल क्‍लासरूम उपलब्ध असून, त्याद्वारे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शैक्षणिक वर्षात १०० टक्‍के शाळा डिजिटल करण्याचा मानस जिल्हा परिषदेचा आहे. 

प्राथमिक शिक्षण हा मुलांच्या भावी आयुष्याचा पाया असल्याने येथे मिळणारे शिक्षणही आधुनिकतेला धरून असणे अत्यावश्‍यक आहे. त्यातच खासगी शाळांची स्पर्धा जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे असल्यामुळे डिजिटल शाळा बनवण्याला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद शाळा व ग्रामस्थही प्रयत्न करत आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राज्यामध्ये अग्रेसर राहिलेल्या सातारा जिल्ह्याने यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकही यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक शाळा सध्या १०० टक्‍के टॅबयुक्‍त बनल्या आहेत. अनेक शाळांतील विद्यार्थी स्मार्ट फोनच्या माध्यमातून गृहपाठ, अध्ययन करत आहेत. 

जिल्ह्यातील १८९८ शाळा सध्या डिजिटल आहेत, तर ८०५ शाळा अद्यापही डिजिटल होणे बाकी आहे. या शैक्षणिक वर्षात या शाळाही डिजिटल करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगातून अशा शाळांना डिजिटल क्‍लासरूम उभारून देण्याचे त्यांनी सूचित केले आहे. त्यामुळे यावर्षी १०० टक्‍के डिजिटल होण्याची आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील लहान-मोठे उद्योजक, व्यावसायिक, बॅंकांनी, सामाजिक संस्थांनी सामाजिक उत्तरदायित्वातून यासाठी मदत केल्यास डिजिटल शाळांसाठी इतर अद्ययावत साहित्य घेणे सोपे होणार आहे. जिल्हा परिषदेने सीएसआर मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. मात्र, त्याला प्रतिसाद कमी मिळत आहे.

झेडपीच्या प्राथमिक शाळा - २७०३ 
डिजिटल शाळा - १८९८ 
आयएसओ शाळा - ७१० 

Web Title: primary school digital school computer lab