Coronavirus : कोरोनाच्या संकटाचा सामना संघभावनेने लढा : सचिन तेंडुलकर

सिद्धार्थ लाटकर
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आज (शुक्रवार) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर,  सौरव गांगुली, विराट कोहली, पी. व्ही. सिंधू आणि विश्वनाथन आनंद यांच्यासारख्या 50 क्रीडा व्यक्तिमत्त्वांशी संवाद साधला. 

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचे संकट वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल सुमारे पन्नास क्रीडापटूंबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. त्या वेळी त्यांनी खेळाडूंना सोशल डिस्टन्सिंगचा अधिकाधिक प्रसार करण्याचे आवाहन केले. या चर्चेअंती लोकांना भेटताना शेकहॅंड करण्याऐवजी 'नमस्ते' करण्यावर राहील असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आज (शुक्रवार) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर,  सौरव गांगुली, विराट कोहली, पी. व्ही. सिंधू आणि विश्वनाथन आनंद यांच्यासारख्या 50 क्रीडा व्यक्तिमत्त्वांशी संवाद साधला. मोदींशी संवाद साधताना तेंडूलकरने कोरोनाच्या लढ्यात देशाने एक संघा सारखे लढा दिला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच यापूढे आपण लोकांशी भेटताना शेकहॅंड करण्याऐवजी नमस्ते करण्यावर राहील असे नमूद करण्यात आले. 

सचिन म्हणाला या प्राणघातक कोरोना व्हायरसशी देशवासियांनी एकसंघपणे लढावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री किरेन रिजिजूजी आणि इतर खेळाडूंना लॉकडाऊनचा काळ तुम्ही कसे हाताळत आहात याविषयीचे वैयक्तिक मत आणि अनुभव सांगण्याची संधी आज (शुक्रवार) आम्हांला मिळाली. "जे अतिसंवेदनशील आहेत अशा वडीलधाऱ्यांची काळजी घेणे आणि त्यांच्याकडून ऐकण्यासाठी त्यांच्या या कथांचा आणि अनुभवांचा अनुभव पंतप्रधानांनी अनुभवायला मिळाला. त्यांनी 14 एप्रिलनंतर निर्धास्त राहू नये या माझ्या निवेदनावर पंतप्रधानांनी प्रकाशझोत टाकला आणि पुष्टीही दिली. आम्ही तो काळ कसा व्यवस्थापित करतो यावर सारे अवलंबून असल्याचे म्हटले. शक्‍य तितके शक्‍य असेल तर आपण हा साथीचा रोग संपल्यानंतरही हात मिळविण्याऐवजी 'नमस्ते' करण्यावर आमचा भर राहील. बहुतांश ठिकाणी आमचा अभिवादन करण्याच्या पद्धतीचा वापर असेल. 

चमकण्यासाठी माेदी एकही संधी साेडत नाहीत काॅंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची टीका 

मानसिक तंदुरुस्तीसाठी शारीरिक स्वास्थ्याइतकीच महत्त्वाची असण्याबाबतही आमची चर्चा झाली. तंदुरुस्त राहण्यासाठी घरी काय करतोय याबाबतही मी माझे विचार नमूद केले. आपल्या संपूर्ण राष्ट्राने एकत्र येण्याची आणि एकमेकांना प्रोत्साहन देण्याची ही वेळ आहे. क्रीडा प्रकारात टीम स्पिरिट आम्हांला जिंकते त्याप्रमाणे आपल्या देशानेही एकसंघ म्हणून काम केले पाहिजे आणि कोरोनावर मात केली पाहिजे असे तेंडूलकरने नमूद केले. 

ये जिंदगी का सवाल है, करो ये प्लीज, दरख्वास्त है करो


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi Coronavirus Covid 19 Sachin Tendulkar Article