"राफेल'वरून आरोप करणाऱ्यांचे "मिशेलमामा'कनेक्‍शन 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 9 जानेवारी 2019

सोलापूर : "राफेल विमानाच्या खरेदीवरून माझ्यावर आरोप करणाऱ्यांचे "मिशेलमामा'बरोबर काय कनेक्‍शन आहे, हे लवकरच स्पष्ट होईल'', असा पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्याचवेळी, मला घाबरविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी देशातील दलालांविरुद्ध "चौकिदाराने' सुरु केलेले सफाई अभियान यापुढे कायम राहील, असा इशाराही त्यांनी दिला. 

सोलापूर : "राफेल विमानाच्या खरेदीवरून माझ्यावर आरोप करणाऱ्यांचे "मिशेलमामा'बरोबर काय कनेक्‍शन आहे, हे लवकरच स्पष्ट होईल'', असा पलटवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्याचवेळी, मला घाबरविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी देशातील दलालांविरुद्ध "चौकिदाराने' सुरु केलेले सफाई अभियान यापुढे कायम राहील, असा इशाराही त्यांनी दिला. 

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद चौपदरीकरण व भुयारी गटारीचे लोकार्पण तसेच स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अमृत योजनेतून हद्दवाढ भागात मलनिस्सारण व्यवस्था सुधारणा, एबीडी एरियातील पाणी व मलनिस्सारण सुधारणा, उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 30 हजार घरांच्या गृहप्रकल्पाची पायाभरणी श्री. मोदी यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलची कळ दाबून करण्यात आली. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री विजय देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार ऍड. शरद बनसोडे आणि माजी आमदार नरसय्या आडम व्यासपीठावर होते. 

मोदी म्हणाले,"हेलिकॉफ्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी एका विदेशी एजंटाला सरकारने ताब्यात घेतले आहे. सध्या तो जेलमध्ये आहे. त्याने एक फार मोठा खुलासा केला आहे. हा एजंट फक्त हेलिकॉफ्टर खरेदीमध्येच नव्हे तर लढाऊ विमानांच्या खरेदीमध्येही लॉबिंग करीत होता. कॉंग्रेसचे जे नते माझ्यावर राफेलप्रकरणी आरोप करीत आहेत, त्यांचे "मिशेलकनेक्‍शन' काय आहे याचे उत्तर द्यावे लागणार आहे. देशाला लुटारूपासून वाचविण्याचे काम हा "चौकीदार' करीत आहे.'' 

गेल्या साडे चार वर्षात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आढावा मोदी यांनी आपल्या भाषणात घेतला. आघाडी सरकारच्या कालावधीत काय स्थिती होती आणि गेल्या साडेचार वर्षांत त्यात किती बदल झाला आहे हे सांगण्यावरच श्री. मोदींचा भर राहिला. त्यांनी आपल्या भाषणाची सुरवात मराठीतून केली. ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर महराज, आई तुळजाभवानी पंढरपूर येथील पांडुरंग -रुक्‍मिणी अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्याचे दामाजीपंत यांना नतमस्तक होऊन तसेच हुतात्म्यांना अभिवादन करीत मला सोलापूरकरांनी आजवर जे प्रेम आणि आशीर्वाद दिले ते कायम ठेवावेत अशी सुरवात त्यांनी केली. त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला. 

अटल पेन्शन योजना, उडाण योजना, पंतप्रधान आवास योजना, विद्युतीकरण, महामार्ग निर्मीती या मुद्यांवर भर देत मोदी यांनी गतसरकार आणि विद्यमान सरकारमध्ये तुलना केली. जी कामे तत्कालीन सरकारला दहा वर्षांत करता आली नाहीत, त्याच्या कितीतरीपट जादा कामे गेल्या साडेचार वर्षांत झाल्याचा दावा त्यांनी केला. सबका साथ सबका विकास हाच भाजप सरकारचा नारा आहे, हेच आमचे संस्कार आहेत. दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, लोकसभेत आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देणारे ऐतिहासिक विधेयक मंजूर झाले, आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचा निर्णय झाला. लोससभेत अजून एक बील काल पास झाले, ज्यामुळे पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान मधून भारतात आलेल्या व भारत माता की जय, वंदे मारतरम म्हणणाऱ्या बाधंवाना भारतीय नागरीकत्व मिळणार आहे.त्यांच्या अडचणी दूर होणार आहेत, असेही श्री. मोदी यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस व गडकरी यांचीही भाषणे झाली. 

जगातील दहा शहरे असतील भारतातील 
देशातील शहरांचा विकास ज्या पद्धतीने होत आहे, तो पाहता आगामी कालावधीत दहा शहरांचा अत्याधुनिक पद्धतीने व काळाच्या गरजेनुसार विकास केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात जगात ज्यावेळी सर्वोत्कृष्ट शहरांची निवड होईल, त्यावेळी दहाही शहरे भारतातील असतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

Web Title: Prime Minister Narendra Modi Criticized Congress leaders related to Rafale