प्राचार्यांकडून साडेपाच लाखाचे पशुखाद्य

beed
beed

करमाळा : दै. सकाळच्या सर्व आवृती मधुन सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याचे दुष्काळाचे वास्तव चिञ मांडणारी बातमी दै. सकाळच्या सर्व आवृतीला 26 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. 'लय भयंकर परिस्थिती आलीया' विहाळ येथील आनंता देवकते यांनी सांगितली दुष्काळाची कहाणी या मध्यळ्याखाली ही बातमी प्रशिध्द झाली. ही बातमी वाचुन पूणे येथे अंहीरत ग्रुप ऑफ इंस्टुटुटमध्ये विनाअनुदानित तत्वांवर प्रचार्य म्हणून कार्यरत असलेले प्रचार्य भुषण पाटील यांनी साडेपाच लाख रूपयाचे 23 टन पशुखाद्य दिले आहे. विशेष म्हणजे या पशुधनासाठी लागणारे पैसे त्यांनी आपल्या प्रव्हडंट फंडातुन काढले आहेत. स्वतःजवळ मदत करण्यासाठी पैसे नसतानाही कर्ज काढुन दुष्काळ भागाला मदत करण्याची पाटील यांची भुमीका प्रेरणादायी आहे. 

दै.सकाळ मधील ही बातमी वाचुन त्यांनी सकाळ सोशल फौऊडेशन विभागात फोन करून विहाळ ता.करमाळा येथे आम्ही जनावरांना पशुखाद्य देण्याची इच्छा बोलुन दाखवली. त्यानंतर सोलापूर आवृत्तीचे संपादक अभय दिवाणजी,करमाळा बातमीदार आण्णा काळे यांच्याशी संपर्क केला.यानंतर मंगळवार ता.21 मे रोजी विहाळ येथे भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

येत्या 30 मे रोजी हे पशुखाद्य वाटप करण्यात येणार असुन यावेळी सहयोगी संपादक अभय दिवाणजी ,प्रचार्य भुषण पाटील, प्रचार्या डाॅ. नंदीनी पाटील हे उपस्थित रहणार आहेत.

दुष्काळी परिस्थिती असल्याने आम्ही मदत करायचा विचार करत होतो.आमच्या कडा गावाकडे पशुखाद्य वाटप करायचे नियोजन होते.माञ दै.सकाळ मध्ये अण्णा काळेंची बातमी वाचली,ही बातमी वाचुन काळीज पिळवटुन गेले , ही बातमी सकाळ मध्ये आली आहे म्हणजे से वास्तव आहे. हा विचार केला आणि आम्ही विहाळ व परीसरात साधारणपणे एक महीनाभर पुरेल ऐवढे पशुखाद्य वाटप करण्याचा निर्णय घेतला.माणसं दुष्काळात कशीही जगतील जनावरांनाचे खुप हाल होतात. त्यामुळे पशुखाद्य देण्याची आमची भूमिका आहे.

याबाबत सकाळचे सोशल फाऊंडेशन ,अभय दिवाणजी यांच्याशी ही बोलणे झाले आहे.फक्त गोरगरिबांच्या जनावरांना हे खाद्य मिळावे ऐवढीच अपेक्षा आहे. या कामात माझी पत्नी डाॅ. नंदीणी हीचा मोठा पाठिंबा आहे.
- प्रचार्य भुषण पाटील, पुणे.

प्राचार्य भुषण पाटील हे खुप हाळव्या मनाचे आहेत.टिव्ही वरील, वर्तमानपत्रातील दुष्काळी बातम्या ऐकुन ,वाचुन त्यांची होणारी घालमेल पाहुन मी व मुलांने तुम्हाला दुष्काळग्रस्तांसाठी काय करावेसे वाटते असे विचारले, त्यांनी पशुखाद्य वाटपाची इच्छा बोलुन दाखवली आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.
- प्राचार्य डाॅ. नंदीनी भुषण पाटील, पुणे.

सकाळ ची बातमी वाचुन प्रचार्य भुषण पाटील यांनी विहाळ गावातील जनावरांसाठी पेंड देण्याचा निर्णय घेतला यात सकाळची विश्वासार्हता किती मोठी आहे हेच दिसुन येते.प्राचार्य पाटील यांनी अक्षरशः कर्ज काढून ही पेंड वाटत आहेत.ही गोष्ट खरोखरच प्रेरणादायी आहे. आम्ही ग्रामस्थ त्यांचे आभारी आहोत.
- आदिनाथ देवकते, विहाळ, ता.करमाळा, जि.सोलापूर 

पाटील कुटुंबाची पार्श्वभूमी.
प्राचार्य भुषण पाटील हे मुळचे कडा ता.आष्टी, जि.बीड येथिल असुन ते नोकरी निमित्त पूणे येथे स्थायिक झाले आहेत.माञ ग्रामीण जीववनाशी त्यांची नाळ जोडलेली आहे. शेतकरी कुटुंबात जन्मेले पाटील हे खुप हालाखीत जगले आहेत.ते विनाअनुदानित महाविद्यालयात प्रचार्य आहेत.त्यांची पत्नी प्रचार्य डाॅ. नंदीनी पाटील या एस. पी. कॉलेजच्या बी.एड.विभागाच्या प्रचार्य म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्या उत्कृष्ट किर्तनकार आहेत.मुलगा इंजिनियर आहे.माञ आपण समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेने ते काम करत आहेत. यापुर्वी 2013 च्या दुष्काळात त्यांनी आष्टी भागात पशुखाद्य वाटप केले होते.यावेळी त्यांनी एचडीएफी बॅकेतुन कर्ज काढले होते.यावेळी त्यांनी प्राव्हडंट फंडातुन सहा लाख रूपये काढले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com