...तर मोदींनाच पायउतार व्हावे लागेल - पृथ्वीराज चव्हाण 

सदानंद पाटील
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

चव्हाण म्हणाले, मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. नोट बंदीचा निर्णय लागू करत असताना मंत्र्यांची बैठक बोलावण्यात आले. सर्व मंत्र्यांचे मोबाईल काढून घेण्यात आले. एक खोलीत मंत्र्यांना बसवून ते निर्णय जाहीर करण्यासाठी निघून गेले. मात्र मोदींनी ठराविक लोकांनाच याची माहिती दिली होती. त्यांनी नोट बंदीचा चांगलाच फायदा घेतला, असा आरोप चव्हाण यांनी केला. 

कोल्हापूर : राफेल घोटाळा, जीएसटी ,नोट बंदी आणि आता रिझर्व्ह बँकेशी सुरू असलेला संघर्ष पाहता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा सत्तेत येण्याचे सोडाच पण पुढील काही महिन्यात मोदींनाच पंतप्रधान पदावरून पाय उतार व्हावे लागेल, अशी शक्यता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.

चव्हाण म्हणाले, मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. नोट बंदीचा निर्णय लागू करत असताना मंत्र्यांची बैठक बोलावण्यात आले. सर्व मंत्र्यांचे मोबाईल काढून घेण्यात आले. एक खोलीत मंत्र्यांना बसवून ते निर्णय जाहीर करण्यासाठी निघून गेले. मात्र मोदींनी ठराविक लोकांनाच याची माहिती दिली होती. त्यांनी नोट बंदीचा चांगलाच फायदा घेतला, असा आरोप चव्हाण यांनी केला. 

मोदींचा नोट बंदीचा निर्णय पुरता फसला आहे. कोणत्याही प्रकारचा काळा पैसा परत आला नाही. त्यामुळे आता नोट बंदीचा प्रकार भाजप सरकारच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्यातच राफेल घोटाळ्यात हे सरकार अडकले आहे. जीएसटीही अंगलट आली असून आता रिझर्व्ह बँक आणि सरकार यात संघर्ष सुरू आहे. आगामी बँक संचालक मंडळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

एकूणच केंद्र सरकारमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहे. आर एस एस नेतृत्व बदलण्याची शक्यता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पायउतार व्हावे लागेल, अशी शक्यता चव्हाण यांनी व्यक्य केली.

Web Title: Prithviraj Chavan criticized narendra modi