अचूक वेध साधायचाय पण...!

सुनील कांबळे
शुक्रवार, 18 मे 2018

पाचगणी - जिद्द, सचोटी अन्‌ मनोबलाच्या जोरावर धनुर्विद्येत यशाचे शिखर गाठण्यासाठी पसरणीच्या (ता. वाई) प्रियांका कासुर्डेला उत्तुंग भरारी मारायची आहे. सातारा जिल्ह्याच्या या लेकीने तिच्या स्वप्नपूर्तीसाठी मदतीची हाक दिली आहे. प्रियांकाला सढळ हाताने मदत मिळाल्यास तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर गरुडझेप घेता येईल. 

मूळची पाचगणी येथील असलेल्या प्रियांकाला शाळेत मिळत असलेले धनुर्विद्येचे धडे, पसरणीच्या डोंगराळ भागात इतरांचा धनुर्विद्येचा सराव पाहून प्रियांकाचा खेळाविषयीचा उत्साह अन्‌ आकर्षण वाढले. वाशिम येथे नवव्या सिनियर राज्य स्पर्धेपासून तिने स्पर्धात्मक खेळाचा श्रीगणेश केला. 
आजपर्यंत तिने सातारा, नगर, पुणे, कोल्हापूर, वाई, औरंगाबाद, पिंपरी- चिंचवड, झारखंड, पटियाला, आंध्रप्रदेश व भुवनेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय, अंतरविद्यापीठ स्पर्धेत सांघिक, वैयक्तिक यश मिळविले आहे.

प्रियांकाचे वडील मजुरी करतात. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
 प्रियांका कासुर्डे ही ग्रामीण भागात राहूनही जिद्दीच्या जोरावर विविध शिखरे पादांक्रांत करत आहे. परंतु, आर्थिक दुर्बलतेमुळे तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या कन्येला मदतीच्या हातांची गरज आहे. क्रीडाप्रेमी, दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, क्रीडा संस्थांनी तिच्या हाकेला साद देतील, अशी आशा तिच्या कुटुंबीयांना आहे.

घरची परिस्थिती बेताची असल्याने प्रियांकाला धनुर्विद्येतील आपला उत्साह आवरता घ्यावा लागला. त्यातच आमची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला हव्या असलेल्या कुठल्याही सुविधा आम्ही पुरवू शकत नाही. 
- संतोष कासुर्डे, पसरणी

Web Title: priyanka kasurde archery player help