ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार चौकशीत "सोधा'ची अडचण 

Problems with inquiry in the grampanchayat Corruption
Problems with inquiry in the grampanchayat Corruption
Updated on: 

नगर : अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती व गटविकास अधिकाऱ्यांवर असलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत चौकशी पूर्ण झाली असली, तरी त्यात आता "सोधा'ची (सोयरे-धायरे) अडचण येऊ लागली आहे. त्यामुळे या चौकशीचा कालावधी मागे-पुढे केला जाण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये व गटविकास अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहाराबाबत चौकशीच्या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य सुषमा दराडे यांनी उपोषण केले होते. त्यानुसार चौकशीसाठी नेमलेल्या तीनपैकी दोन पथकांनी अहवालही दिले असून, त्यात आठ जण दोषी आढळल्याचे म्हटले आहे. मात्र या दोषींमध्ये "काही' जणांचे नातेवाईक अडकल्याने चौकशीचा कालावधी कमी करावा आणि आपल्या नातेवाइकांना वाचवावे, यासाठी काहींची धडपड सुरू झाली आहे. यासाठी आता अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये काहींच्या चकरा सुरू झाल्या आहेत. 

प्रशासनावर दबावाचा प्रयत्न 
काही जण पत्राद्वारे, तर काही जण आपल्याच पद्धतीने प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाली असून, प्रशासनाने निःपक्षपणे केलेली चौकशी कायम ठेवून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. कोणी कोणाचा नातेवाईक असला, तरी गैरप्रकार केलेला असेल तर त्याला सोडू नका, असे कर्मचारी म्हणत आहेत. 

सरसकट कारवाईची मागणी 
मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी अकोले तालुक्‍यातील त्या पाच ग्रामपंचायती व पंचायत समितीतील गेल्या दहा वर्षांतील कारभाराची चौकशी करून कारवाई करणे गरजेचे आहे. नात्यागोत्यांचा विचार न करता सरसकट कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. 

अहवालाला उशीर का? 
गैरव्यवहाराची चौकशी दहा दिवसांमध्ये पूर्ण झाली आहे. त्याबाबतचा अहवाल तयार करण्यास प्रशासनाकडून दिरंगाई केली जात आहे. या दिरंगाईमुळेच चौकशीला आता फाटे फुटू लागले असून, प्रशासनाकडून चौकशी अहवालाला उशीर का होतो, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ped Water Shortage
Mumbai Bengaluru Special Train
TET Exemption Plea Rejected
Koyna Dam additional water demand for Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com