लेखक प्रा. काशीनाथ वाडेकर यांचे निधन

लेखक प्रा. काशीनाथ वाडेकर यांचे निधन

सांगली - येथील लेखक प्रा. काशीनाथ वाडेकर (वय 85) यांचे आज निधन झाले. 1996 मध्ये सेवानिवृत्तीनंतर ते सांगलीत आले. विश्रामबाग परिसरातील सहयोगनगर येथे अलीकडे ते स्थायीक झाले होते. गुरुवारी (ता. 18) रक्षाविसर्जन आहे. 

प्रा. वाडेकर यांनी सुरवातीस कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात मानसशास्त्राचे प्राध्यापक होते.  त्यानंतर सावंतवाडी येथील एसपीजे महाविद्यालयात मानसशास्त्राचे प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून सुमारे 35 वर्षे ते कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांनी विपुल वृत्तपत्रीय लेखन केले.

"पान चुना तंबाखू' हा त्यांचा 2007 मध्ये प्रसिध्द झालेला लेख संग्रह होता. "मात्रा वेलांटी' हा विनोदी कथा संग्रह, "ज्ञानेश्‍वरी'वर त्यांनी संपादनपर ग्रंथ लिहिला. सांगलीतील नाट्यसंमेलनातच्या संयोजनात त्यांनी हिरिरीने पुढाकार घेतला. पु. भा. भावे स्मृती समितीवर ते कार्यरत होते. सावंतवाडीशी त्यांचा असलेला स्नेह निवृत्तीनंतरही कायम ठेवला. "गोष्टी घरांकडील' ही एकांकिकेचा प्रयोग त्यांनी सांगलीतील कलावंताना घेऊन जाऊन तिथे केला. यानिमित्ताने त्यांनी आपल्या गणगोतांचा स्नेहमेळावाच तेथे भरवला. गोष्टीवेल्हाळ स्वभावामुळे ते जिल्हा (नगर) वाचनालयांच्या वाचक परिवारात लोकप्रिय होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com