...म्हणून महाबळेश्‍वरातूनच मुख्यमंत्र्यांनी फिरवली सूत्रे

...म्हणून महाबळेश्‍वरातूनच मुख्यमंत्र्यांनी फिरवली सूत्रे
Updated on

सातारा : महाबळेश्‍वर येथील स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून, राहुरी कृषी विद्यापीठाने साधारण दोन कोटी रुपयांचा प्रकल्प तयार केला आहे. हा प्रकल्प मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे. महाबळेश्‍वरमधील विद्यापीठाच्या गहू गेरवा संशोधन केंद्रातच हे स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
 
जिल्ह्यातील नगदी पिकांचे विविध वाण व जाती निर्माण करून त्यातून अधिक व निर्यातक्षम उत्पादन मिळविण्यासाठी यापूर्वी आले, बटाटा, कांदा आणि स्ट्रॉबेरी संशोधन केंद्रे व्हावीत, अशी मागणी सातत्याने होत होती. प्रत्येक वेळी केवळ आश्‍वासनेच मिळत होती. प्रत्यक्षात कोणतेच संशोधन केंद्र आजपर्यंत सुरू झाले नाही; पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाबळेश्‍वरच्या खासगी दौऱ्यावर आल्यावर त्यांनी येथील स्ट्रॉबेरीचे उत्पन्न आणि त्यासाठी असलेला वाव लक्षात घेऊन स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र सुरू करण्याची सूचना दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यासाठी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यामध्ये आढावा घेतला.

Video : अन् जवानांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या

त्यानंतर सूत्रे फिरली आणि राहुरी कृषी विद्यापीठाने स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राचा दोन कोटींचा प्रकल्प तयार करून मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे. या प्रकल्प अहवालानुसार महाबळेश्‍वरातील गहू गेरवा संशोधन केंद्रात स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राचे काम सुरू झाले आहे. आता या केंद्रात अत्याधुनिक सुविधांची उपलब्धता केली जाणार आहे, तसेच नवीन जातींची निर्मिती आणि रोपे ठेवण्यासाठीची वातानुकूलित सुविधा निर्माण केली जाणार आहे. परदेशातून रोपे आयात करून लागवड करताना शेतकऱ्यांना करावी लागणारी कसरत आता थांबणार आहे, तसेच नवीन जातींचा शोध लागणार असल्याने यातून उत्पन्न वाढ होऊन निर्यातक्षम स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणे सोपे होणार आहे. सध्या जिल्ह्यातील कमी पावसाच्या ठिकाणी मातृरोपे घेऊन त्यांचे संगोपन केले जाते. त्यातून रोपांची निर्मिती केली जाते. ही रोपे पुन्हा महाबळेश्‍वर, पाचगणी परिसरात लावली जातात; पण पाऊस जास्त असल्याने महाबळेश्‍वरात रोपे ठेवणे अडचणीचे होते. मात्र, संशोधन केंद्र सुरू झाल्याने रोपे निर्मितीसाठी होणारा खर्च कमी होणार आहे.

 Video : प्रेमीयुगलास मारहाण योग्य नव्हे : रिंकू राजगूरु

कृषी विभाग आणि राहुरी कृषी विद्यापीठाकडून या संशोधन केंद्राचे काम सुरू करण्यात आले आहे. लवकरच तेथे इतर आधुनिक सुविधाही उपलब्ध केल्या जातील. त्यासाठी विद्यापीठाचा दोन कोटींचा प्रकल्प मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळून उर्वरित कामेही सुरू होतील. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे संशोधन केंद्र सुरू होण्याचे स्वप्नतरी सत्यात उतरणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे. 

संशोधन केंद्रात काय असेल... 

  • नवीन रोपांची निर्मिती 
  • मातृरोपांचे संगोपन 
  • स्ट्रॉबेरीच्या नवीन जातींची निर्मिती 
  • उत्पन्न वाढविणाऱ्या जातींची निर्मिती

    हेही वाचा - Video : उदयनराजे सध्या काय करतात...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Anjali Vetal from Karad wins bronze medal at U-15 Asian Wrestling Championship in Thailand
Wildlife rescuer trapped by rat snake
Why are Sangli farmers opposing the Shaktipeeth Highway?
Marathi News Esakal
www.esakal.com