भावी गुरुजींनी धरली पर्यायी रोजगाराची वाट 

prospective teacher on the way to alternative employment
prospective teacher on the way to alternative employment

सोलापूर : आई-वडिलांच्या इच्छेनुसार शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले. परंतु डीटीएड, टीईटी उत्तीर्ण होऊनही मागील पाच वर्षांपासून शिक्षक भरतीच झाली नाही. काहीजणांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला, मात्र अद्यापही त्यांची स्वप्नपूर्ती होईना. त्यामुळे काहीजण शेती तर काहीजण टोल नाक्‍यावर तसेच काही विद्यार्थी दूध डेअरीवर, डांबरीकरणावर, किराणा दुकानात, खासगी कंपन्यांमध्ये कामाला जात असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.

राज्यातील 11 लाख डीटीएड उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षा दिली. त्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करत 66 हजार विद्यार्थी त्यामध्येही उत्तीर्ण झाले. परंतु, 2013 पासून त्यांना अद्यापही नोकरीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यामुळे आता त्यांनी नोकरीची वाट न पाहता पर्यायी रोजगाराची वाट धरली आहे. भावी शिक्षकांच्या नोकरीची वाट अद्यापही खडतरच समजली जात आहे. पवित्र पोर्टलद्वारे आता शिक्षक भरती होणार आहे. परंतु, काही खासगी संस्थाचालकांनी भरमसाट डोनेशन घेऊन रिक्‍त जागा भरल्या आहेत. त्यामुळे त्यांचाही प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

पाच वर्षांपासून सातत्याने सरकारकडून डीटीएड विद्यार्थ्यांना शिक्षक होण्याकरिता टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले. आई-वडिलांच्या इच्छेनुसार जिद्द, चिकाटीतून तीही परीक्षा उत्तीर्ण झालो. परंतु, शिक्षक भरती निघत नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सोलापूर-पुणे महामार्गावरील टोल नाक्‍यावर काम करीत आहे. - तुकाराम लांडगे, सावळेश्‍वर (ता. मोहोळ) 

आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी गुरुजी होण्याचे ध्येय बाळगून बारावीत 72 टक्‍के गुण मिळविले. डीएड केल्यानंतर दोन वर्षे नोकरीची वाट पाहिली. मात्र अतिरिक्‍त शिक्षक, डीएड अथवा टीईटी उत्तीर्ण झालेल्यांची संख्या पाहून दूध संकलन केंद्रात कामाला सुरवात केली. - सोमनाथ राऊत, सावळेश्‍वर (ता. मोहोळ) 

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे अतिरिक्‍त शिक्षकांचे प्रमाण वाढले आहे. आता मराठी माध्यमाच्या शाळांची गुणवत्ता सुधारून पटसंख्या वाढविणे गरजेचे आहे. 
- गंगाधर म्हमाणे, शिक्षण संचालक 


आकडे बोलतात... 
टीईटी परीक्षार्थी 
11,01,576 
टीईटी उत्तीर्ण 
66,014 
होणारी शिक्षक भरती 
18,000 
अतिरिक्‍त शिक्षक 
13,067

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com