महिला वर्गाच्या संरक्षणासाठी "ताईगिरी पथक' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

इस्लामपूर - येत्या काळात महिला व मुलींच्या संरक्षणासाठी "ताईगिरी पथक' नेमणार असून फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात दारूबंदीचा मोठा लढा आक्रमकपणे उभारला जाईल, अशी जाहीर घोषणा सामाजिक कार्यकर्त्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आज येथे केली. 

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात तुजारपूर (ता. वाळवा) येथील भास्कर पाटील व वाळवा तालुका श्रमिक मराठी पत्रकार प्रतिष्ठानतर्फे सानिका पाटील हिच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. प्राचार्य डॉ. जे. के. पाटील अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य डॉ. नितीन शिंदे, अलका साळुंखे प्रमुख उपस्थित होते. 

तृप्ती देसाई म्हणाल्या, ""मंदिर, मशिदीत महिलांना धर्माचे ठेकेदारच विरोध करत आहेत. 21 व्या शतकात महिलांना विरोध होतो ही आपल्यासाठी लाजीरवाणी बाब आहे. आजही आपल्या समाजात मुलगा-मुलगी विषयी अंधश्रद्धा पाळली जाते. दारूसारख्या व्यसनाने अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त होत आहेत. त्यामुळे संपूर्ण दारूमुक्तीसाठी संघटना प्रयत्न करेल. समाजातील सर्वच स्तरात मुलींचे स्वागत झाले पाहिजे. मुलगा-मुलगी भेदभाव चुकीचा आहे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील मारहाण, सोशल मीडियावर बदनामी, फोन व पत्राद्वारे धमक्‍या आल्या. मात्र आम्ही न घाबरता काम करीत राहिलो. महिलांबरोबर पुरुषांनाही कोणी महिला कायद्याच्या आधारे त्रास देत असेल तर त्यांच्या पाठीशीही आमची संघटना ठामपणे काम करेल.'' प्राचार्य डॉ. पाटील यांचे भाषण झाले. यावेळी सौ. विजयमाला व संजय पाटील, पत्रकार शांताराम पाटील, हर्षदा करे, सानिका व भास्कर पाटील यांचे सत्कार झाले. प्रा. तृप्ती थोरात यांनी बनविलेल्या समाजशास्त्र विषयाच्या मोबाइल ऍपचे उद्‌घाटन झाले. प्रा. माधुरी पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. मंगल गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. धर्मवीर पाटील यांनी आभार मानले. 

... आम्ही त्यांना चोप देऊ 
समाजात जिथे जिथे अन्याय, अत्याचार दिसेल तेथे मागे न राहता पुढाकार घ्या. ज्यांना जमणार नाही त्यांनी किमान त्याचे चित्रीकरण करा, आम्हाला माहिती द्या, आम्ही त्यांना चोप देऊ, अशा भाषेत तृप्ती देसाई यांनी उपस्थित विद्यार्थिनींना आवाहन केले.

Web Title: For the protection of women in the class "taigiri team '