मोर्चाबाबत बेळगाव व खानापुर तालुक्यात जनजागृतीला वेग

मराठी कागदपत्रांसाठी चालढकल करणाऱ्या कर्नाटक सरकारला मराठी भाषिकांची ताकद दाखवून देण्यासाठी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला
protest for Marathi documents in belgaum and khanapur public awareness
protest for Marathi documents in belgaum and khanapur public awarenesssakal

बेळगाव : मराठी कागदपत्रांसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या जनजागृतीला वेग आला आहे. शहराबरोबरच बेळगाव तालुका आणि खानापूर तालुक्यामध्ये विविध गावात जाऊन मोर्चा बाबत मोठी जनजागृती करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठी कागदपत्रांसाठी चालढकल करणाऱ्या कर्नाटक सरकारला मराठी भाषिकांची ताकद दाखवून देण्यासाठी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला आहे. तसेच एक जून रोजी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मराठीतून कागदपत्रे देण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे 27 जून रोजी भव्य मोर्चा काढला जाणार आहे.

मध्यवर्तीच्या आदेशानुसार गेल्या काही दिवसांपासून बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी, वाघवडे, उचगाव, निलजी, किणये, बसरीकट्टी आदी गावांमध्ये बैठका घेण्यात आल्या आहेत. तर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे नंदगड, हलशी, जांबोटी, कणकुंबी, शिरोली व इतर गावात बैठका घेण्यात आल्या आहेत. मोर्चाला अजून चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामूळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न समिती कार्यकर्त्यांनी करावा असे आवाहन करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसांत शहराच्या विविध भागात बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे यावेळी मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरीक सहभागी होतील असा विश्वास समिती नेत्यातून व्यक्त केला जात आहे.

मोर्चा भव्य प्रमाणात काढला जाणार आहे. त्याबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली आहे. त्यामूळे यावेळी एक मराठा लाख मराठा असा नारा देत काढण्यात आलेल्या मोर्चा प्रमाणे गर्दी होइल असा विश्वास आहे. कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन जनजागृती करावी

- दीपक दळवी, अध्यक्ष मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com