संतप्त प्रवाशांनी पाटण आगारात रोखून धरल्या एसटी बस

यशवंत दत्त बेंद्रे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

तारळे (जि. सातारा) : 'पाटण आगाराची तारळेतुन संध्याकाळी पावणे पाचच्या दरम्यान सुटणारी जळव मणदुरे पाटण बस फेरी बदलुन तारळे जळव जिमनवाडी मणदुरे पाटण अशी करावी', या मागणीसाठी संतप्त विद्यार्थी व ग्रामस्थांनी मणदुरे येथे पाटण आगाराच्या एसटी बस सुमारे दोन तास अडवून धरल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासन दिल्यानंतर बस सोडण्यात आल्या. यावेळी मार्गावर मोठी कोंडी झाली होती तर काही विदयार्थ्यांना वार्षिक परीक्षा सुरु असल्याने फटकाही बसला.

येथे बाजारपेठेचे केंद्र आहे. परिसरातील सडावाघापुर, सडानिनाई, मणदुरे केरळ पिटेवाडी पासुन लोक तारळेत दैनंदिन खरेदी व बाजारास   नियमित येत असतात.

पाटण आगाराकडुन पाटण सडावाघापुर तारळे व तारळे जळव पाटण असा दर तासाला नियमित फेऱ्या सोडल्या जातात. यातील सायंकाळच्या एका फेरीने अनेकांना गैरसोयीच्या सामना करावा लागतोय. तारळेतुन संध्याकाळी पावणे पाचच्या दरम्यान सुटणारी तारळे जळव मणदुरे पाटण ही बस फेरी बदलुन तारळे जळव जिमनवाडी मणदुरे पाटण अशी गत पंधरा दिवसांपुर्वी वळविण्यात आली होती.

जिमनवाडीला गाडी जाउ लागल्याने ती पुर्वीपेक्षा सुमारे तासभर पाटणला उशीरा पोहोचत असल्याने तेथे तारळे कडे येणाऱ्या प्रवाशी व विदयार्थ्यांना तेवढा वेळ ताटकळत बसावे लागत आहे. पाटणहुन सुटल्यावर तारळेला पुर्वी हि बस आठ वाजता पोहोचत होती आता मार्ग बदललयाने ती साडेनउच्या आसपास पोहोचते. याचा विदयार्थ्यांसह प्रवाशांना त्रास होत आहे.

एवढा वेळ लागत असल्याने प्रवाशी पर्यायी वाहनाने घर गाठत आहेत. सकाळी कॉलेजला गेलेले विदयार्थी रात्री दहाच्या सुमारास घरी पोचतात. दैनिक सकाळनेही प्रवाशांच्या गैरसोयीची दखल घेत गुरुवारी बस फेरी पुर्ववत करा मथळयाखाली वृत्त प्रकाशित केले होते.

मार्गातील मणदुरे ग्रामस्थ व विदयार्थ्यांनी सकाळी सात वाजता रस्त्यात लाकडी ओंडके टाकुन रास्ता रोको केला. सुमारे दोन तासांनंतर आगारप्रमुख श्री उथळे व स्थानक प्रमुख श्री भिसे यांनी मणदुरेत धाव घेतली. ग्रामस्थांची समजुत काढत सोमवारपर्यंत बस फेरी पुर्ववत करु असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यावर रास्ता रोको मागे घेण्यात आला. 

Web Title: Protests against ST management in Patan depot

टॅग्स