esakal | जोपर्यंत 'महाविकास'चं सरकार आहे, तोपर्यंत बँकेची चौकशी होणार नाही I Political
sakal

बोलून बातमी शोधा

जोपर्यंत 'महाविकास'चं सरकार आहे, तोपर्यंत बँकेची चौकशी होणार नाही

सभासद आणि ठेवीदारांच्या हितासाठी बँकेचे विशेष लेखापरीक्षण करणे गरजेचे आहे.

जोपर्यंत 'महाविकास'चं सरकार आहे, तोपर्यंत बँकेची चौकशी होणार नाही

sakal_logo
By
अजित झळके

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराविरुद्ध सहकार विभागाला आमदार मानसिंगराव नाईक, शेतकरी नेते सुनिल फराटे यांनी पुरेसे पुरावे देऊनही चौकशी गुंडाळली गेली आहे. सभासद आणि ठेवीदारांच्या हितासाठी बँकेचे विशेष लेखापरीक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी आज रिझर्व्ह बँकेकडे तक्रार अर्ज दाखल केला असून जिल्हा बँकेच्या कारभाराचे विशेष लेखापरीक्षण करावे, अशी मागणी केल्याची माहिती भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी दिली.

ते म्हणाले, ‘‘जिल्हा बँकेची चौकशी गुंडाळली जाणार, हे माझे भाकित खरे ठरले. राज्यातील बलवान मंत्री कारभारी असताना चौकशी लागणेच आश्‍चर्यकारक होते. चौकशी लावण्याची सुपारी कुणीतरी घेतली होती, असा आरोप बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्यांनी केला आहे. आमदार मानसिंगराव नाईक तक्रारदार असून ते जयंत पाटील यांना नेते मानतात. आता सुपारीचा कर्ता करविता कोण, हे त्यांनीच पहावे? दिलीपतात्यांनी दोषी आढळलो तर भर चौकात फाशी घेईन, असे आव्हान दिले आहे. त्यांनी निष्पक्ष चौकशीला सामोरे जावून बँकेतील कारभारात दोष नसल्याचे स्पष्ट होऊ द्यावे. दोष असतील तर ते पाप कुणाचे हेही जाहीर करावे. चौकशीला स्थगिती मिळाल्याने ते शक्य नाही. आम्ही शेतकऱ्यांची बँक, कष्टकऱ्यांचे बँकेतील पैसे वाचवण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठीच थेट रिझर्व्ह बँकेकडे तक्रार दाखल केली आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडेही पत्र व्यवहार करत आहोत.’’

हेही वाचा: कोल्हापूर पुन्हा हादरलं! कागलनंतर कापशीत 7 वर्षीय मुलाचा नरबळी

ते म्हणाले, ‘‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार असेपर्यंत सहकार विभाग जिल्हा बँकेची चौकशी करणार नाही. कारभार प्रामाणिक असेल तर बड्या थकबाकीदारांची, बिगरशेती कर्जांची यादी शहराच्या मध्यवर्ती पुष्पराज चौकात लावावी. या यादीत काही बडी नावे आहेत. कारखाने बंद आहेत, उद्योग बंद आहेत, त्यांना कमी मालमत्ता तारण घेऊन जास्तीचे कर्ज वाटले गेले आहे. तोंड बघून कर्ज वाटप झाले आहे. आता वसुलीत जिरवाजिरवी सुरु आहे. याचा सोक्षमोक्ष रिझर्व्ह बँकेने लावावा.’’

शेतकऱ्यांची कर्जे अडवली आणि...

पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘जिल्हा बँकेने अनेक विकास संस्थांतून मध्यममुदत कर्ज वसुलीच्या कारणाने थांबवले आहे. कोरोना, अतीवृष्टी, महापुराने शेतकरी उद्‍ध्वस्त झाला. त्यातून थकबाकी झाली. समान हप्ते पाडल्यास कर्जे फिटतील, त्यासाठी सर्वच शेतकऱ्यांची अडवणूक योग्य नाही. बँकेत नेत्यांना भरभरून कर्ज देताना वसुलीची चिंता नाही. सामान्यांची मात्र कोंडी केली आहे.’’

हेही वाचा: पुरोगामी कोल्हापुरात अंधश्रद्धेचे आणखी किती बळी?

loading image
go to top