'विरोधकांचं चांगलं काम जयंत पाटलांच्या डोळ्यात खुपत असतं'

'जयंत पाटील यांच्यामध्ये माणुसकी राहिलेली नाही'
political
politicalesakal
Summary

'जयंत पाटील यांच्यामध्ये माणुसकी राहिलेली नाही'

इस्लामपूर - समाजात अनेकांनी उभा केलेले चांगले काम मोडून काढणे, विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकविणे, त्यांना बदनाम करणे ही जयंत पाटील (Jayant Patil) यांची विकृत संस्कृती झाली आहे. हे मोडून काढण्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. घाबरू नका, आपल्याला न्याय नक्की मिळेल, असा विश्वास भाजपाचे (BJP) प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार (Pruthviraj Pawar) यांनी कामगारांना दिला. येथील प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मधील कामगार युनियनच्या वतीने सुरू असलेल्या उपोषण ठिकाणी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

political
'आदरणीय पवारसाहेब तुमची अडचण...', भाजपचा पुणे मेट्रोवरून टोला

ते म्हणाले, प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या ठिकाणी कोरोना रुग्णावर अत्यंत चांगले उपचार झाले. जयंत पाटील यांना विरोधकांचे चांगले काम डोळ्यामध्ये खुपत असते. आपल्यावर झालेली कारवाई ही अत्यंत दुर्दैवी आहे. जयंत पाटील यांच्यामध्ये माणुसकी राहिलेली नाही. पोलिस व आरोग्य अधिकारी विरोधात न्यायालयीन लढा उभा करावा लागेल. यावेळी प्रकाश शिक्षण कामगार युनियनचे सचिव कुलदीप खांबे, उपाध्यक्ष सुजित पाटील, आदी कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री जयंत पाटील, पोलिस व आरोग्य अधिकारी यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीचा अहवाल भाजपाचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांच्याकडे मांडला. यावेळी वाळवा तालुका भाजपा अध्यक्ष धैर्यशील मोरे, मधुकर हुबाले, चंद्रकांत पाटील, संदीप सावंत, प्रवीण माने, यदुराज थोरात, अक्षय पाटील, विश्वजित पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com