सार्वजनिक जलस्त्रोतांना आता ‘यूआयडी’!

अशोक मुरुमकर
गुरुवार, 17 मे 2018

सोलापूर - राज्यातील नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे म्हणून सर्व सार्वजनिक जलस्रोतांची माहिती एकत्रित केली जाणार असून, या जलस्रोतांच्याच पाण्याची तपासणी प्रयोगशाळांमध्ये होणार आहे. याबरोबर प्रत्येक जलस्रोतांना ‘यूआयडी’ दिला जाणार असून, यातून दूषित व चांगल्या पाण्याचे स्रोत समजणार आहेत. त्यामुळे त्वरित उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.

ग्रामीण भागात काही ठिकाणी जलसुरक्षारक्षक एका ठिकाणच्या स्त्रोताच्या पाण्याची तपासणी करतात, मात्र सार्वजनिक जलस्त्रोत दुसऱ्याच ठिकाणी असतो. यातून अनेकदा नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते. या गैरप्रकाराला आता चाप बसणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून सर्व जलस्त्रोतांचे ऑनलाइन निश्‍चितीकरण केले जात आहे. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून वेळोवेळी सार्वजनिक जलस्त्रोताच्या पाण्याचे नमुने तपासले जातात. यातून दूषित व चांगले पाणी अशा स्रोतांची वर्गवारी केली जाते. मात्र, स्थानिक पातळीवरून अनेकदा वेगळ्याच स्रोताचे पाणी तपासणीसाठी येते. यामध्ये पारदर्शकता यावी म्हणून मोबाईल ॲप तयार केले आहे.

राज्यातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ३४ जिल्ह्यांतील सर्व पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक स्त्रोत ‘जीपीएस’द्वारे निश्‍चित केले जाणार आहेत. स्थानिक पातळीवरून आरोग्यसेवक, जलसुरक्षारक्षक व ग्रामसेवक यांनी यासाठी सार्वजनिक स्त्रोतांची माहिती देणे अपेक्षित आहे, असे सोलापूर जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील पाणी गुणवत्ता सल्लागार डी. डी. व्हटे यांनी सांगितले. 

जलस्रोतांचे मॅफिग करण्याचे काम सुरू आहे. ३१ मेपर्यंत हे काम पूर्ण होणार असून, सर्व स्रोतांची माहिती एकत्रित येणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी मदत होणार आहे.
- विजय लोंढे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

आकडेवारी
राज्यातील सार्वजनिक जलस्रोत - ३,२१,४२०

Web Title: public water source UID Number