सांगलीः भाजपच्या व्यासपीठावर शिवाजीराव शेंडगेंच्या प्रतिमेचे पुजन

अजित झळके
रविवार, 23 डिसेंबर 2018

सांगली - नागज ( ता. कवठेमहांकाळ) येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कोनशिला कार्यक्रमात भाजपच्या व्यासपीठावर धनगर समाजाचे नेते, माजी मंत्री दिवंगत शिवाजीराव शेंडगै यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. शेंडगे यांच्या पुण्यतिथीचा योग साधत भाजपने धनगर समाजास जवळीक साधण्याचा प्रयत्न यातून केल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती.

सांगली लोकसभा मतदार संघातील धनगर समाजाच्या मतांचे गणित यामागे डोकावते आहे. खासदार संजय पाटील यांनी पुण्यतिथीचा योग साधत याचे आयोजन केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमास उपस्थित होते. 

यावेळी खासदार पाटील यांनी आरेवाडी बिरोबा देवस्थान विकासासाठी पंधरा कोटींची मागणी केली. ही मागणी मंजूर केल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली. 

सांगली मतदार संघात धनगर समाज नेत्यांनी भाजपविरोधी मोहिम उघडली आहे. गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे यांनी हल्लाबोल सुरू केला आहे. त्यात खासदार संजय पाटील यांना प्रमुख लक्ष्य केल आहे. अशावेळी भाजपच्या व्यासपीठावर शिवाजीराव शेंडगे यांची प्रतिमा हा चर्चेचा विषय झाला आहे.

Web Title: Puja of Shivajirao Shendge image on BJP platform