पल्स पोलिओ मोहिम रविवारी

 Pulse Polio Campaign Sunday
Pulse Polio Campaign Sunday

कोल्हापूर : पल्स पोलिओ मोहिम रविवारी ( ता.19) महापालिकेतर्फे आयोजित केली आहे. 0 ते 5 वयोगटातील मुलांना हा डोस देण्यात येणार आहे. महापालिकेचे सर्व यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी पाल्यांना हा डोस द्यावा, असे आवाहन महापौर ऍड.सूरंमजिरी लाटकर, आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. 

ते म्हणाले, पोलिओ आजारापासून वाचण्याच्या दृष्टीने जगभरातील सर्व देशांनी काही दशकापासून अव्याहत प्रयत्न करुन पोलिओचे कायमस्वरुपी उच्चाटन करण्यात यश संपादन केले आहे. त्यास आपला देशही अपवाद नाही. 27 मार्च 2014 ला भारत पोलिओमुक्त झाला. परंतू दुर्दैवाने शेजारील पाकिस्तान व अफगाणिस्तान या दोन्ही देशात जगात कोठेही नाही परंतू येथे आहे. अशा पोलिओ आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. 

रविवारी(ता.19) सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 0 ते 5 वर्षे वयोगटातील सुदृढ, अशक्त, आजारी, नवीन जन्म, अशा सर्व मुलांना पोलिओ लस पाजली जाणार आहे. पोलिओ लस 100 टक्के सुरक्षित असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत हे जगभरात सिध्द झालेले आहे. शहरामध्ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील 48,689 बालकांना पोलिओ लस पाजली जाईल. लस पाजण्याची सोय शहरामधील शासकीय,निमशासकीय दवाखाने, अंगणवाडया, मनपाच्या शाळा अशा 173 ठिकाणी उपलब्ध दिली आहे. 1241 कर्मचारी या मोहिमेत मनपामार्फत प्रत्यक्ष मोहिमेवर उपस्थित राहून सेवा बजावणार आहेत आणि शहरात येणा-या लाभार्थींना फिरती पथके मार्फत लस पाजली जाईल . बस स्टॅंड, रेल्वे स्टेशन, अंबाबाई मंदिर, शहरात येणा-या रस्त्यावरील नाके, उसतोड कामगार वस्त्या, वीटभट्टया, मोठी बांधकामे याठिकाणी लाभार्थी यांना लस पाजली जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com