गोकुळकडून दूध संकलन बंद; पुणे-मुंबईत दूध टंचाई?

सकाळ वृतसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

- कोल्हापुरला पुरेल एवढा साठा गोकुळकडे आहे
- मात्र, पुणे-मुंबईकडे होणारी दूध वाहतूक रद्द 
- 21 टँकरमधील साडेपाच लाखाहून अधिक लिटर दूध शिल्लक​

कोल्हापूर : जिल्ह्यातील वाढती पूरपरिस्थिती पाहता गोकुळने उद्या सकाळपर्यंत दूध संकलन करू नका अशा सूचना दूध संस्थांना दिल्या आहेत. पुणे- मुंबईकडे जाणाऱ्या 21 टँकरमधील साडेपाच लाखाहून अधिक लिटर दूध शिल्लक आहे. यातील पाच लाख दुधाचे रीप्रोसेसिंग करून त्याचे वाटप केले जाणार आहे.

आज सकाळी अर्धा लिटरचे पॅकिंग असलेले 300 लिटर दूध आंबेवाडी, चिखली येथे मोफत देण्यात आले. उर्वरित दूधही आवश्यकतेनुसार मोफत दिले जाणार असल्याचे गोकुळकडून सांगण्यात आले आहे.

गंभीर पूरपरिस्थितीत जिल्ह्याला पुरेल इतका दूधसाठा गोकुळ कडे आहे. मात्र उद्या संध्याकाळपर्यंत पुणे मुंबईकडे दूधवाहतूक होणार नाही. त्यामुळे या शहरांना दूध टंचाईचा सामना करावा लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune and Mumbai might face shortage of Gokul Milk due to Kolhapur Flood