बंगळूरला जाण्यासाठी वाहतुकदारांना सोलापूर मार्गाचा पर्याय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

एसटी महामंडळाची कराड - पाटण परिसरातील ग्रामीण भागातील सेवा काेलमडली.
 

सातारा ः पूर परिस्थितीमुळे पुणे-बंगळूर महामार्गवारील पुणे ते कऱ्हाड हा रस्ता आज (रविवार) सहाव्या दिवशीही अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान बंगळूरला जाणाऱ्या वाहतुकदारांना आम्ही खंडाळा, लोणंद, सोलापूर, विजापूर मार्गे बंगळूर हा पर्यायी रस्ता असल्याची माहिती देत आहोत. त्यानूसार सुमारे 50 वाहतुकदार मार्गेस्थ झाल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग पोलिस यांच्यावतीने देण्यात आली.
हा मार्ग लांब पल्ल्याचा पडत असल्याने काही वाहतुकदार पून्हा परत फिरत आहेत. परंतु अनेकांनी पूढे जाणे पसंत केले असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
पुणे ते कऱ्हाड या रस्त्यावरील वाहतुक चारचाकी वाहनांसाठी सुरळीत सुरु आहे. तसेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा देखील नियमीत उपलब्ध आहे. कऱ्हाडहून कोल्हापूरकडे सोडली जाणारी चार चाकी वाहने किणी टोलनाका येथेच थांबविण्यात येत आहेत. कऱ्हाड - सांगली (इस्लमापूर मार्गे ) वाहतुक पुर्णतः बंद आहे. सांगली येथे जाण्यासाठी कऱ्हाड, कडेगाव, विटा, तासगांव अशी वाहतुक सुरु आहे.
पाेलादपूर घाटातील रस्ता बंद झाल्याने महाबळेश्‍वरहून पोलादपूर मार्गे महाडला जाणारी वाहतुक आज (रविवार) बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे सातारा आगारातून महाडला जाणारी बस सेवा बंद ठेवली आहे. 
एसटी महामंडळाची सुरु असलेले सेवा.
सातारा - पुणे व पुणे - सातारा विना थांबा व अन्य सेवा. 
सातारा - मुंबई व मुंबई - सातारा विना थांबा तसेच अन्य सेवा.सातारा - कऱ्हाड सेवा. 
एसटीच्या वाहतुकीच्या अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
सातारा विभाग नियंत्रक ः 02162- 231580.
सातारा बसस्थानाक ः 02162-234567. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune-Bangloare highway still remain closed due to flood situation