esakal | पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघात कराडचा चालक ठार
sakal

बोलून बातमी शोधा

accident

पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात कराडचा चालक ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सौंदलगा (बेळगाव) : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा येथे कुर्ली फाट्यावर सोमवारी (ता. ६) पहाटे चारच्या सुमारास कराड येथून संकेश्वरकडे निघालेल्या मालवाहू टेम्पोचा मागील डाव्या बाजूचा टायर फुटला. यावेळी वाहन पलटी झाल्याने चालक अश्पाक शौकत बागवान (वय ४२, रा. मसूर ता. कराड, जि. सातारा) हा जागीच ठार झाला. तर वाहनाचे मालक अब्दुलसत्तार रफिक बागवान (वय ३८, रा. बिरदेवनगर,संकेश्वर) हे जखमी झाले. घटनेची नोंद ग्रामीण पोलिसात झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की,चालक अश्पाक हे कराड येथून संकेश्वर येथे पिकअप वाहनातून आले भरून जात होते. त्यांचे वाहन कुर्ली फाट्यावर आले असता वाहनाचा मागील टायर फुटल्याने चालक अश्पाक यांचा वाहनावरील ताबा सुटला.

हेही वाचा: झाडांना खिळे ठोकणाऱ्यांवर कारवाई करा’

त्यामुळे वाहन रस्त्यातच पलटी झाले.यावेळी अश्पाक यांचा जागीच मृत्यू झाला.तर त्याच्या बाजूला असलेल्या सीटवरील अब्दुलसत्तार यांना किरकोळ दुखापत झाली.दरम्यान घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस पथकाचे सहायक उपनिरीक्षक एम. एस. सूर्यवंशी, हवालदार एम. एस. सगरेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी वाहन रस्त्यातच पलटी झाल्याचे दिसून आले.

त्यामुळे याची माहिती पोलिसांनी रस्ते देखभाल जयहिंद कंपनीच्या भरारी पथकाला दिली. त्यानुसार पथकाचे निरीक्षक प्रकाश बामणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला घेत वाहनात अडकून पडलेला मृतदेह बाहेर काढला.

जखमी अब्दुल सत्तार यांच्यामुळे पोलिसांना योग्य ती माहिती मिळाली.यावेळी वाहनाचा चक्काचूर झाला तर आतमध्ये भरलेला माल सर्वत्र विखुरला गेला.मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी, ग्रामीणचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांनी भेट देऊन पाहणी केली.

loading image
go to top