मिरज : पुणे, बेळगाव रेल्वे वाहतूक पूर्ववत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

मिरज - मिरजेतून पुणे आणि बेळगाव या मार्गांवरील रेल्वेसेवा आज सुरळीत झाली. मिरजेतून कराडसाठीची जादा रेल्वे मार्गस्थ झाली, तर बेळगावच्या दिशेने हरिप्रिया एक्‍सप्रेस रवाना झाली. किर्लोस्करवाडी ते भिलवडीदरम्यान पुराच्या पाण्याने धोकादायक पातळी गाठल्याने मिरज - पुणे मार्गावर रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

मिरज - मिरजेतून पुणे आणि बेळगाव या मार्गांवरील रेल्वेसेवा आज सुरळीत झाली. मिरजेतून कराडसाठीची जादा रेल्वे मार्गस्थ झाली, तर बेळगावच्या दिशेने हरिप्रिया एक्‍सप्रेस रवाना झाली. 

किर्लोस्करवाडी ते भिलवडीदरम्यान पुराच्या पाण्याने धोकादायक पातळी गाठल्याने मिरज - पुणे मार्गावर रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. बेळगाव मार्गावर गोकाक ते पाच्छापूर दरम्यान लोहमार्ग खचल्याने गाड्या बंद होत्या. यामुळे रेल्वेची पूरकोंडी झाली होती. रेल्वेने वेगाने काम करत पूरकोंडी फोडण्यात यश मिळवले. आज पुण्याकडील वाहतूक सुरू झाली. बेळगाव मार्गही खुला झाला.

गेले तीन-चार दिवस स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांना रेल्वे कर्मचारी संघटनांनी जेवाणाची व्यवस्था केली. बसस्थानकातही व्यावसायिकांनी अडकलेल्या प्रवाशांना जेवण दिले. मिरजेतून आता कोल्हापूर वगळता पुणे, सोलापूर व बेळगाव ही रेल्वे वाहतूक सुरु झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune , Belgaum Rail service on way